माजी मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री श्रीराम वैरागडे गुरुजी यांचे 6 ऑगस्ट 21 ला दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृती निमित्त त्यांच्या कुटुंबियांनी, स्नेहीजनांनी पुढाकार घेऊन शिक्षक दिनी, श्रीराम वैरागडे गुरुजी फाउंडेशन स्थापन केले आहे.
या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार, विद्यापीठ स्तरावर पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने
व्याख्यानमाला, शैक्षणिक रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांसाठी पुरस्कार आदि उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे या फाउंडेशनचे कार्यवाह नरेंद्र वैरागडे यांनी सांगितले
– देवेंद्र भुजबळ 9869484800