Home बातम्या व्ही.जे.टी.आय : रस्ते सुरक्षा

व्ही.जे.टी.आय : रस्ते सुरक्षा

0

व्ही.जे.टी.आय : रस्ते सुरक्षा

लोहमार्ग पोलीस आयुक्त मुंबई,डॉ.रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस,मुंबई आणि व्ही.जे.टी.आय. मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ते सुरक्षा आणि तरुणांची जबाबदारी’ या विषयावर नुकतेच सत्र तसेच पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

व्ही.जे.टी.आय मध्ये प्रथम वर्ष बी.टेक करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार समाजकार्य विषय शिकवितांना समाजातील सामाजिक वास्तवाची जाणीव व्हावी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य, राष्ट्रप्रेम, सेवाभाव विषयाची रुजवणूक करावी यासाठी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागी करून हा उपक्रम घेण्यात आला.

मुंबई लोहमार्ग पोलीस, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय खेडकर आणि त्यांचे सहकारी, सर्वश्री नरेश रोटकर, शैलेश म्हात्रे, गजानन बोंगाणे यांनी वाहतुकीचे नियम, नवीन साधने तसेच नागरिक म्हणून कर्तव्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

यावेळी प्रथम वर्ष बी.टेक करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा विषयावर पोस्टर प्रदर्शन आयोजित केले होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्ही.जे.टी. आय मधील प्रा.देशपांडे, प्रा.कृष्ण कनकगिरी, प्रा.सचिन बर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version