नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या जाई फाउंडेशन, मुंबई द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच, मुंबईचे तिसरे शब्दवेल साहित्य संमेलन नुकतेच पुणे येथे उत्साहात संपन्न झाले.
कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आझम कॅम्पस मध्ये झालेल्या या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक आसावरी काकडे या अध्यक्षा, 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे उदघाटक म्हणून कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार स्वागताध्यक्ष, राज्यकर उपआयुक्त वस्तू व सेवा कर विभाग, मुंबई विभाग मा.मेहबूब कासार
कार्याध्यक्ष म्हणून तर राज्यकर सहआयुक्त वस्तू व सेवा कर विभाग, पुणे रेश्मा घाणेकर प्रमुख अतिथी
म्हणून लाभले होते.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटन सोहळा, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, गझल मुशायरा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा असे दर्जेदार सत्रनिहाय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
समारोपीय सोहळ्याचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नामदेवराव जाधव, प्रा.नरेशचंद्र काठोळे, प्रा.सदाशिव शेळके उपस्थित होते.
समारोपीय सोहळ्यात वार्षिक पुरस्कार वितरण तसेच सर्व निमंत्रित कवींचा सत्कार करण्यात आला. पसायदानाने या संमेलनाची सांगता झाली.
या संमेलनास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन जमलेल्या साहित्यिकांची उपस्थिती लाभली होती.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800