सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ,पनवेल या संस्थेच्या मुंबई विभाग कार्यकारिणी तर्फे नुकतेच अनुयोग विद्यालय, खार (पूर्व) मुंबई येथे वृक्षारोपण व खुल्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुजा काळे, मीनल कांबळे, कविता झुंजारराव, महेंद्र सुर्यवंशी,रामदास गायधने, संतोष खाडे, संजय बने आदींनी पावसासह, आईवडील, बालपण, भुत, मन यांसारख्या विविध विषयावर कविता सादर करीत कविसंमेलन गाजवले.
‘प्रत्येकाने आपल्या आणि घरातल्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, आनंदाच्या प्रसंगी, आपल्या घरातील एखाद्याच्या स्मरणार्थ एक तरी झाड लावून त्याची जोपासना केली तरी वर्षाला दहा ते पंधरा झाडे एक कुटुंब लावू शकेल’ असा विचार कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रतिभा सराफ यांनी आपल्या भाषणातून मांडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सतिश चिंदरकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन सर्वांच्या कवितेचे महत्व अधोरेखीत केले. श्री. सौरभ देवेंद्र इंगळकर यांनी रेखाटलेल्या यावर्षीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री चौधरी, छाया वांगडे, सचिव सौ. अश्विनी अतकरे, सहसचिव रामदास गायधने, खजिनदार देवेंद्र इंगळकर, केंद्रिय प्रसिद्धी प्रमुख विलास पुंडले यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा चऱ्हाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव अश्विनी अतकरे यांनी केले. शब्दवेलच्या सर्व उपक्रमांमध्ये जास्तीतजास्त साहित्यिकांनी सहभागी होण्याचे विनम्र आवाहन अध्यक्ष प्रविण बोपुलकर यांनी केले आहॆ.
नवी कार्यकारिणी याप्रसंगी मुंबई व नवी मुंबई विभाग कार्यकारिणी अध्यक्ष पदासाठी सौ. छाया सुभाष वांगडे, सचिव जयश्री चौधरी, उपाध्यक्षा शिल्पा चऱ्हाटे, सल्लागार निलूताई मानकर, सदस्यपदी अंजना कर्णिक, गौरी शिरसाट, डॉ.शैलजा करोडे यांची आगामी तीन वर्षांसाठी एकमताने निवड करण्यात आली. नव्या कार्य कार्यकारिणीने सातत्याने विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
शब्दवेल साहित्य संघाचे उल्लेखनीय कार्य सर्वाना प्रेरीत करण्या सारखे आहे साहित्यातून समाजजागृती आणि वृक्षारोपनातून पर्यावरण खरच प्रेरणादायी आहे . अभिनंदन मुंबई शब्दवेल टिम
सन्माननीय महोदय
शब्दवेलचे सविस्तर वृत्त प्रकाशित केल्याबद्दलआपले मनःपूर्वकआभार 🙏🙏
अप्रतिम उपक्रम
सर्जनशील शब्दवेल साहित्य मंचावर घेण्यात येणारे सर्वच उपक्रम अगदी नियोजनबद्ध व उत्कृष्ट असतात.
सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेलची वृक्षारोपणासंबंधीची माहिती उत्तमरीत्या सामावून घेतलीत, मनापासून धन्यवाद!