जाई फाउंडेशन द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंचाचे प्रथम राज्यस्तरीय संमेलन नुकतेच अमरावती येथे, मातोश्री विमलाबाई देशमुख महिला महाविद्यालयात मोठ्या थाटात पार पडले.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिका प्रा प्रतिभा सराफ यांची उपस्थिती लाभली. उद्घाटक म्हणून युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे, स्वागताध्यक्षपदी विद्यालयाच्या डॉ. स्मिता देशमुख तर कार्याध्यक्षपदी शब्दवेलच्या सन्माननीय सल्लागार अंजली ढमाळ होत्या. प्रमुख अतिथी मध्ये तेजराव पाचरणे (राज्यकर सहआयुक्त जी. एस. टी. अमरावती), श्याम ठक (अध्यक्ष अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच) डॉ. मंदा नांदूरकर होत्या.
या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना प्रा. प्रतिभा सराफ यांनी डिजिटल मीडियाचा वापर करून साहित्यिक चळवळी अधिक गतिमान करता येण्याचे प्रतिपादन केले. तसेच साहित्यिकांनी कुठल्याही साहित्य प्रकाराच्या मोहात न पडता अगदी मुक्तपणे व्यक्त होण्याचा मोलाचा सल्ला दिला.
सकाळच्या उद्घाटन सोहळय़ानंतर ज्येष्ठ साहित्यिका मेघना साने यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कथाकथन तद्नंतर दुपारच्या सत्रात बबन सराडकर
(ज्येष्ठ साहित्यिक) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले.
तर समारोपीय सोहळ्यात अध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांचे बहुमोल मार्गदर्शन रसिकांना लाभले. शेवटी प्रमुख कार्यवाह प्रविण सोनोने यांनी आभार मानले तर राष्ट्रवंदनेने संमेलनाची सांगता झाली.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रविण बोपुलकर, सचिव अश्विनी अतकरे, उपाध्यक्षा शितल राऊत, रंजना कराळे, व्यवस्थापक नरेंद्र लोणकर, प्रमुख कार्यवाह प्रविण सोनोने, शब्दवेल अमरावती जिल्हाध्यक्ष आबासाहेब कडू यांसह पूर्ण शब्दवेल टीमने मेहनत घेतली.
– टीम एनएसटी. 9869484800