नमस्कार मंडळी.
हल्ली आंतरजालाचे (ऑनलाईन) प्रस्थ फार वाढले आहे. बऱ्याच गोष्टी आंतरजालाच्या माध्यमातून आपल्याला घरात बसून बघायला, शिकायला मिळतात. आपली बरीच कामेही आंतरजालाच्या माध्यमातूमच होत असतात. दैनंदिन जीवनात काही बाबतीत हे माध्यम आपल्याला फायदेशीर ठरत आहे. अर्थातच नाण्याला जशा दोन बाजू असतात त्याप्रमाणे फायद्याबरोबर काही तोटेही असतात पण ते वापर करणाऱ्यावर अवलंबून असते.
तर.. अशा या आंतरजालाच्या माध्यमातून एका साहित्यिक समुहात भेटलेल्या आम्ही मैत्रिणी मिळून साहित्य सेवेच्या माध्यमातून अशीच एक नव संकल्पना साकारली आहे.
आपले लिखाण श्रोत्यांसमोर आणायला पुस्तक प्रकाशन हे एक अप्रतिम माध्यम आहे आणि ते नेहमीच राहणार आहे. पण आजच्या काळाचा विचार करता आम्ही मैत्रिणींनी आपले लिखाण, विचार समोर आणण्यासाठी आंतरजालाचा वापर करत शब्दसंवाद हे you tube channel सुरु केले आहे.

शब्दसंवाद मधून सर्व वयांच्या दर्शकांशी आम्ही सुसंवाद साधत आहोत जो सर्वसमाविष्ट (All in one) असतो.
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आणि त्याप्रमाणे आवड निवडही अनेक प्रकारची असते. मनोरंजनासाठी बऱ्याच गोष्टीत विविधता शोधली जाते .. उदाहरणचं द्यायचे म्हणले तर.. रोज आपण एकाच प्रकारचे अन्न किंवा खाद्यपदार्थ खाऊ शकत नाही तर त्यातही आपल्याला विविधता लागते जसे की गोड, तिखट, चटपटीत, चमचमीत तर कधी एकदम साधं सुधं.. तसेच इथे सुद्धा आम्ही आपणास विविध प्रकारचे वैचारिक साहित्य मेजवानी देण्याच्या प्रयत्नात आहोत.
हल्ली आंतरजालावर आपल्याला या गोष्टी सहज उपलब्ध होतात. पण शब्दसंवाद मध्ये आम्ही प्रेक्षकांची आवड जपण्याचा प्रयत्न करत आहोत. कुणाला हलकं फुलकं साहित्य आवडत असेल तर कुणाला लालित्यमय, कुणाला अध्यात्मिक आवडत असेल तर कुणाला विनोदी वा वैचारिक.. असे विविधांगी नटलेले साहित्य आपणास देण्यासाठी शब्दसंवाद- शब्दांचा मनस्पर्शी संवाद हे माध्यम आम्ही आपणासाठी आणले आहे.
आपल्या पोर्टलतर्फे वाचकांसाठी एक गोड विनंती आहे की सर्व वाचकांनी https://youtube.com/@shabdsanwad?si=M_SqLOPR5NQfT3S2 या संकेत स्थळावरती जाऊन शब्दसंवादला सर्वांनी जरूर भेट द्यावी.
शब्दसंवाद परिवाराचे सदस्य बनत अनमोल अभिप्राय देत साथ द्यावी. आपल्या मित्र परिवारात, विविध समुहात पाठवत आपल्याला काय ऐकायला आवडेल याबाबत जरूर कल्पना द्यावी. आम्ही दर्शकांची इच्छा पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करू. आशा आहे आमचा हा प्रयत्न, आमचे भाव आपणापर्यंत नक्की पोहचतील.
आपल्या,

— सौ. मनिषा दिपक पाटील.
पालकाड, केरळ.
— श्रीम. उज्वला कालिदास कवडे.
इंद्रायणीनगर. भोसरी, पुणे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
