अनलज्वाला : २४ मात्रा [८+८+८]
शब्दांनीही भाव मनाचे सांभाळावे
सत्व उराशी वाढवणारे विचार द्यावे..
संस्काराच्या तत्वावरती जगणे आहे
अन् गेल्यावर आठवणींचे पान उरावे..
नभात क्षणभर विजा खेळती, अस्त पावती
आक्रोशाला शांत मनाने बघ जिंकावे..
नश्वर असले पण जगण्याला अर्थ पाहिजे
प्रेम जगाला दिले किती ते पडताळावे..
भाव नसे तर व्यर्थ वाटते शब्दांकन जे
भाव दिपाचे कागदावरी उमटत जावे..
— रचना : सौ. दिपाली वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
शब्दात गुंफलेले भाव
घेती मनाचा ठाव
👌👌