Home साहित्य शब्द शब्द पेरताना

शब्द शब्द पेरताना

2

शब्द शब्द पेरताना
माणूसकी जपावी
भेदभाव न करता
मैत्री सच्ची करावी

शब्द असे अनमोल
उच्चार गोड तयाचे
साधावे संवाद असे
दुरावे सरावे मनाचे

शब्द सोहाळे मनमोहक
मनामध्येच रुजतात
आनंदी जीवनाचा या
आनंद मनामध्ये लुटतात

शब्दांच्या खेळातून
निखळ आनंद घ्यावा
मत्सर द्वेष दुर करुन
प्रेम रंग उधळावा

परवीन कौसर

✍🏻रचना : परवीन कौसर. बेंगलोर

2 COMMENTS

  1. सुंदर आशयघन रचना..
    शब्द शब्द म्हणजे काय
    शब्द म्हणजे माझे मन
    सरस्वतीचा वरदहस्त
    हेच जगती मोठे धन….

  2. खूप छान संदेश देणारी कविता.
    शब्दांच्या खेळातून
    निखळ आनंद घ्यावा
    मत्सर द्वेष दूर करुन
    आनंद उधळावा…
    अगदी महत्वपूर्ण संदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version