Home यशकथा साहित्य संमेलन आणि “मी” !

साहित्य संमेलन आणि “मी” !

4

नुकत्याच नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वानुभव सांगताहेत कवयित्री सुरेखा गावंडे…..

नाशिक येथे संपन्न झालेल्या “९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा” मध्ये माझी “सपान” कविता सादर करणे आणि मान्यवरांच्या हस्ते
स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र स्विकारणे हे माझ्या आयुष्यातील सुंदर सोनेरी क्षण ठरले.

माझा भाऊ जिवराम गावले, याच्या चिन्मय मिशन बुक स्टाॕलला दिलेली भेट, तसेच भरारी प्रकाशनच्या लता गुठे मॕडम आणि मा. आमदार आदरणीय आप्पा शिंदे यांच्या केमिस्ट ग्रंथालयातर्फे “आमची माती आमची माणसं” या आयुर्वेद विशेषांकाचे संपादक प्रा. संजय जाधव या सर्वांची घडलेली अनपेक्षित भेट आनंदीमयी झाली.

साहित्य संमेलनात महेंद्र देशपांडे यांच्या कलाकुंज प्रकाशनतर्फे डाॕ. प्रा. लक्ष्मीकांत भट यांचा “काव्यप्रभात” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माझ्या आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या संमेलनात कविवर्य अशोकजी बागवे, राजनजी लाखे, अरुणजी म्हात्रे, सुधीरजी चित्रे, बाळासाहेब तोरसकर, आनंदजी पेंढारकर, राठोड सर तसेच नाट्य दिग्दर्शक अशोकजी समेळ, डोंबिवली येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे सर या सर्वांची घडलेली आनंदमयी भेटही कायमची लक्षात राहील.

संमेलनात जेवण, नाष्टा, चहा, बुक स्टाॕल, कविकट्टा, प्रकाशन कट्टा, मराठी भाषेवरील लघु चित्रपट येथे कोठेही गडबड, गोंधळ दिसला नाही. नियोजन समितीने सर्व शांततेत, शिस्तबद्धपणे पार पाडले. सर्वाचे हार्दिक अभिनंदन आणि खूप आभार.

एखादी माहेरवाशीण माहेरी जावून माहेरच्या लोकांना भेटून तृप्त होवून येते. मी सुद्धा या कुसुमाग्रज नगरीला भेट देऊन जणू ज्ञानाच्या मळ्यात फिरुन तृप्त होवून आले. एकूण विचारांची देवाण-घेवाण होणारे साहित्य संमेलन म्हणजे सर्व साहित्यिकांसाठी वर्षेभराचे टाॕनिक आहे असे म्हणायला हरकत नाही.

सुरेखा गावंडे

– लेखन : कवयित्री सौ.सुरेखा गावंडे
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800

4 COMMENTS

  1. सुरेखा, तुझे त्रिवार अभिनंदन.साहित्यिक श्रेत्रात,
    प्रगती पथावर सतत यशस्वी पाऊले पडतील असे ईश्वर चरणी सदिच्छा. मनापासून माझ्या सखीला धन्यवाद.

  2. सुरेखाताई खूप छान लिहिले आहे!
    आपण दाखवलेला विश्वास, आनंद आणि भरभरून दिलेली दाद यासाठी मनापासून धन्यवाद!
    प्रतिभा सराफ

  3. सुरेखाताई तुमचे अभिनंदन..
    साहित्य संमेलनाच्या वातावरणातले क्षण खरोखरच आनंददायी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version