Wednesday, February 5, 2025
Homeलेख'शब्द संपदा' ( १ )

‘शब्द संपदा’ ( १ )

जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा वर्ष १८५७ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेला मराठी-इंग्लिश शब्दकोश आता जगात कोठेही कुणालाही विनामूल्य वापरता येतो. त्यासाठी तुमच्या कडे हवे फक्त संगणक किंवा अँड्रॉइड मोबाईल आणि इंटरनेट. राष्ट्रीय ग्रंथालय आणि विविध संस्थांनी मदत केल्यामुळे द डिजिटल डिक्शनरीज ऑफ साऊथ एशिया प्रोग्राम यांच्या माध्यमातून ते शक्य झाले आहे. त्यासाठी ही लिंक पुरेशी आहे.:

https://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/

मराठी भाषेच्या विकासासाठी आणि ती वापरणाऱ्या प्रत्येकासाठी साठी ही मोठी संधी आता उपलब्द्ध झाली आहे. अनेकांना याविषयी माहिती नाही. ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी भाषेचे अभ्यासक प्रा डॉ किरण ठाकूर यांनी या विषयावर गेल्या वर्षी पुस्तिका या लिंक वर प्रसिद्ध केली आहे.
या शब्दकोशातील रंजक माहितीचा खजिना ते दर शुक्रवारी सादर करणार आहेत. या आधीचे त्यांचे “बातमीदारी करताना” हे आपल्या पोर्टलवर प्रसिध्द झालेले सदर अभ्यासपूर्ण, वाचनीय ठरले आहे. तसेच हे ही ठरेल, असा विश्वास आहे. सरांचे पुनश्च एकदा स्वागत करू या.

आजच्या पहिल्याच भागात ते नुकत्याच आपल्या नव्या राष्ट्रपतींनी वापरलेल्या एका शब्दाविषयी सांगत आहेत. …..

James Thomas Molesworth Marathi-English Dictionary Project

“जोहार नमस्कार”

आपल्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी राष्ट्राला उद्देशून पहिले दोन शब्द पंचवीस जुलै २०२२ रोजी उच्चारले ते “जोहार नमस्कार” असे होते. टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकाने या दोन शब्दाचाच मथळा केला. श्रीमती मुर्मू यांच्या फोटो खालील मजकुरात “जोहार” याचा अर्थ दिला आहे. हा शब्द किंवा “जुहार” हा शब्द उडिशा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांत एकमेकांना नमस्कार करण्यासाठी आदिवासी बांधव वापरतात असे स्पष्ट केले आहे.

खूप लहानपणी जळगाव जिल्ह्याच्या विविध गावी राहिलो, तेव्हा ‘जोहार’ हा शब्द ऐकला होता. बालगंधर्वांच्या आवाजातील “जोहार मायबाप जोहार” हे भक्ती गीत तेव्हा आणि आता अनेक वेळा ऐकले. अलीकडे आकाशवाणीवरच नव्हे तर युट्युब वर या गाण्याची गोडी वेगवेगळ्या गायकांच्या गाण्यातून ऐकवायला मिळाली.

राष्ट्रपती महोदयांनी वापरलेले हे दोन शब्द ऐकले तेव्हा जोहार शब्दाचा अर्थ शब्दकोशात दिला आहे का ते पाहिले पाहिजे असे वाटून, जे टी मोल्सवर्थ यांच्या १८५७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मराठी-इंग्रजी शब्दकोशात पाहिला. तो शब्द त्याकाळी प्रचलित होता, असे दिसते.

त्याचा अर्थ असा दिला आहे: जोहार jōhāra m (जोहारो or योद्धर: S) The word used by the महार, चांभार & c. Communities, in saluting their betters or each other. 2 The word of obeisance used to a Rájá by his attendants, implying “O warrior !”

बाल गंधर्वांनी “जोहार माय बाप जोहार” हे भक्तीगीत आपल्या गाण्याच्या माध्यमातून अजरामर करून ठेवले आहे. त्यांच्या सारख्या अनेक गायक, गायिकांनी पांडुरंगाची आळवणी या गीतातून केली आहे.

आज युट्युब वर धांडोळा घेतला तेव्हा या मराठी गीताने पुन्हा एकदा मोहिनी घातलीच, पण आणखी एक नवा शोध त्यानिमित्ताने लागला तो असा:

“जोहार जोहार नारंग बारू” असे शब्द असलेले अनेक संथाली गायक, गायिकांनी ओडिशा मध्ये गायिलेले,
खूप लोकप्रिय असलेले भक्ती गीत आहे. संथाली आदिवासींनी या गीता सोबत केलेले नृत्य देखील तितकेच मोहक आहे. ऐकून पाहा एकदा :
https://www.youtube.com/watch?v=XqPDyB68xxc

प्रा. डॉ. किरण ठाकूर

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी