सुमारे ३ वर्षांपूर्वी गरीब वृद्धांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील, नेवासे गावाजवळ मोफत वृद्धाश्रम स्थापन करण्यात आला. समाजकार्यातील एम एस डब्ल्यू ही पदवी प्राप्त केल्या नंतर, काही वर्षे समाज कल्याण क्षेत्रात काम केल्या नंतर श्री रावसाहेब मगर यांनी हा वृद्धाश्रम सुरू केला. पूर्णपणे लोकांच्या देणग्या, मदतीवर सुरू आहे. हा वृद्धाश्रम सध्या भाड्याच्या जागेत असून जागा मालकाने जागा खाली करून देण्याचा तगादा लावला आहे.दरम्यान वृद्धाश्रमाच्या जवळच एक जागा वृद्धाश्रमास विकत मिळत आहे. १० लाख रुपये किंमत असलेल्या या जमिनीसाठी अमेरिकेतील श्री रमेश लोकरे व सौ स्मिताताई लोकरे या दांम्पत्याने ५ लाख रुपये दिले आहेत.

श्रीमती कल्पना गायकवाड, पाडळी, ता.पैठण, जिल्हा- औरंगाबाद यांनी १ लाख रुपये, सी एस आर डी संस्थेचे माजी संचालक श्री केवलकृष्ण कनोजिया सर यांनी २० हजार रुपये, तेथिलच निवृत्त प्राध्यापक डॉ उषा लोळगे यांनी १० हजार रुपये, नागपूर येथील युको बँकेचे निवृत्त व्यवस्थापक श्री वामन सर यांनी ५ हजार रुपये, सौ दीपाली केतन हेडा ५ हजारो रुपये, निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी ५ हजार रुपये, ईतर दानशूर व्यक्तीं असे जवळपास २ लाख २५ हजार रुपये दिले आहेत. अजून २ लाख ७५ हजार रुपयांची मदत हवी आहे. तेव्हढी मदत गोळा झाली तर या वृद्धाश्रमाला जमिनीची खरेदी करता येईल. जमीन मिळाल्यावर ३ खोल्या बांधून देण्यासाठी काही देणगीदार तयार आहेत. वृद्धांसाठी मोफत असलेला हा महाराष्ट्रातील बहुधा एकमेव वृद्धाश्रम असावा. तरी या उदात्त कार्यासाठी आपण आपल्या परीने मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
आपण आपली मदत पुढील बँक खात्यात जमा करू शकता.
अक्षय ग्रामीण युवा किडा व सामाजिक विकास संस्थां, मक्तापूर ता. नेवासा जिल्हा अहमदनगर
बॅकेचे नाव : बॅक आप महाराष्ट्र, शाखा नेवासा
खाते नंबर : 60070064850.
IFC CODE : MAHB- 0000147.
पैसे प्राप्त होताच संस्था चालक श्री रावसाहेब मगर यांच्या पुढील मोबाईल क्रमांकावर (7775015063) नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक पाठविल्यास पावती पाठविणे सोईचे होईल.
– देवेंद्र भुजबळ. +919869484800.