Home बातम्या शरद चौधरी : मानाचा मुजरा

शरद चौधरी : मानाचा मुजरा

1

निवृत्त माहिती संचालक श्री. शरद चौधरी, नागपूर यांना पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे काल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्याविषयी व्यक्त करण्यात आलेल्या पुढील भावना या प्रातिनिधिक स्वरूपाच्याच आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चौधरी साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन. योगायोग म्हणजे येत्या 28 तारखेला त्यांचा 80 वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

आदरणीय चौधरी साहेब जनसंपर्क म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे, तर माणसांच्या मनाशी नाते जोडण्याची एक संवेदनशील कला आहे आणि ही कला आपण आपल्या आयुष्यभर जपली.

मी १९८७ पासून आपल्या कार्याचा साक्षीदार आहे. नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली, तो अनुभव आजही प्रेरणादायी ठेवा आहे. आपली कार्यशैली संयम, अभ्यासू वृत्ती आणि लोकांशी जुळवून घेण्याच्या विलक्षण क्षमतेने समृद्ध होती. प्रत्येक व्यक्तीशी सन्मानाने, आपुलकीने संवाद साधत आपण “अधिकारी” या चौकटीपलीकडे जाऊन “माणूस” म्हणून मनात घर केले.

आज आपणास पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त प्रदान करण्यात येत असलेला “जीवन गौरव सन्मान” हा आपल्या दीर्घकालीन सेवेला, निष्ठेला आणि जनहितासाठी केलेल्या अथक कार्याला मिळालेला अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे.

निवृत्तीनंतरही आपण जपलेली माणुसकी आणि जिव्हाळ्याची नाती हेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचे खरे वैभव आहे.

आपल्या कर्तृत्वाला सलाम…
आपल्या प्रवासाला मानाचा मुजरा…
आपले मनःपूर्वक अभिनंदन !
पुढील आयुष्यप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !

विजय होकर्णे

— लेखन, छायाचित्रे : विजय होकर्णे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेल्या श्री. शरद चौधरी सरांचा खूप सुंदर जीवन परिचय करून दिला आहे. खूप छान लेख वाचून त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला. चौधरी सरांचे हार्दिक अभिनंदन आणि ८० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व सप्रेम नमस्कार. जीवेत् शरदः शतम्!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version