शाकंभरी पौर्णिमा दिनांक 19/1/22
प्रणुचाराक्षरी (1)(22)
शाकंभरी
पौष मास
पौर्णिमा ही
येते खास
जगताची
शाकंभरी
लाखो डोळे
नामे स्मरी
भारतात
मंदिरात
भाज्या फळे
अर्पितात
दूजे दिनी
वाटतात
दीन भक्त
करतात
भाज्याधारी
पार्वतीचे
शाकंभरी
रुप तीचे
पुराणात
शत वर्ष
दुष्काळात
तो संघर्ष
पार्वतीचा
धावा केला
ऋषी मुनी
संघर्षेला
पावसाचा
तो वर्षाव
अन्न मिटे
तो तनाव
पृथ्वीकडे
डोळे पाही
हिरवळी
सुखे वाही
नदी नाले
वाहतसे
तप केले
फलितसे
सहस्रात
भाजी खाई
सफलता
मिळे बाई
नदीमध्ये
स्नान करी
सूर्याकडे
मुखावरी
अर्ध्य वाही
शाकंभरी
उपासना
भक्त करी
हिवाळ्यात
भाज्या येती
उद्देशास
साफल्येती

– रचना : सौ शोभा कोठावदे
खुपच आगळी, वेगळी कविता/शब्दरचना. शब्द बांधणे अवघड वाटते. कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. 👏👏👏
खूप छान