मुंबई येथील नावाजलेल्या संजीवन कला विकास प्रतिष्ठान आयोजित गाथा शौर्याची नवदुर्गा/ शौर्य पुरस्कार सोहळा नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघात
शानदारपणे संपन्न झाला .
या राज्यस्तरीय सन्मान संध्येमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष सुनीताताई शिंदे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, निवृत्त माहिती संचालक श्री.देवेंद्र भुजबळ, अभिनेत्री प्रेमा किरण, सिने-नाट्य अभिनेत्री नयन पवार, डॉ.वाजा, सुप्रसिद्ध समाजसेविका प्रतिभा बागवे, साहित्यिका विचारवंत, शिवमती अनिता ताई काळे, श्री विनोद सावंत, शालिनीताई गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व वक्त्यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेच्या सोळाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उद्योग, व्यवसाय, पर्यावरण, शिक्षण, कीर्तन, कला, संस्कृती, सामाजिक कार्य, सौंदर्य, आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रातील विविध जणांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्राच्या सर्व स्तरातून पुरस्कारासाठी आलेल्या व्यक्तींचे, त्यांच्या यशाचे कौतुक यावेळी करण्यात आले. विशेष म्हणजे पुरस्कार प्रदान करीत असताना गौरवमूर्तींच्या कार्याची माहिती दिली गेल्याने पुरस्कार विजेत्या महिला आज किती विविध क्षेत्रात, विविध प्रकारचे कार्य समर्थपणे करीत आहे, हे प्रभावीपणे समजत होते.
संस्थेच्या सचिव व्हॉईस क्वीन पूर्णिमा शिंदे यांनी आपल्या सुमधुर आवाजात कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. तर संस्थेचे सहसचिव श्री एन डी खान यांनी आपल्या गोड आवाजात सुंदर प्रास्ताविक केले.
२५० हुन अधिक मराठी, हिंदी चित्रपटा तुन भूमिका केलेल्या, जन्मजात कलावंत असलेल्या प्रेमाकिरण यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सादर केलेल्या नृत्य अदाकारीने एकच जल्लोष निर्माण झाला आणि उपस्थितांची सुद्धा नकळत पावलं थिरकू लागली. त्यामुळे हा सोहळा केवळ औपचारिक सोहळा न ठरता एक आनंददायी अविस्मरणीय सोहळा ठरला, हे या कार्यक्रमाचे मोठेच यश म्हणावे लागेल.
सर्वश्री सुशांत शिंदे , लक्ष्मण चव्हाण ,आदित्य गायकर या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
– टीम एनएसटी 9869484800