छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली 21 आणि 22 मार्च 1920 रोजी माणगांव येथे अस्पृश्य समाजाची परिषद सम्पन्न झाली. या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुढारी म्हणून घोषित केले. याच परिषदेमध्ये बाबासाहेबांनी ठराव पास करून शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सणाप्रमाणे साजरा करावा असे उपस्थितांना सांगितले.
याच पार्श्वभूमीवर राहुल खांडेकर यांनी
“सणासम शाहू जयंती करू साजरी शाहू जयंती करू” हे गीत लिहिले आहे. हे गीत शाहीरा सीमाताई पाटील आणि जॉली मोरे यांच्या सुरेल आवाजामध्ये ध्वनिचित्रमुद्रित करण्यात आले आहे.
या गीत वीडियोची लिंक पुढीलप्रमाणे आहे. -https://youtu.be/P2RjI1CaMKU
वाचकांसाठी हे गीत पुढे देतआहे.
माणगावच्या भीमरायाच्या आदेशाला स्मरू…
सणा सम शाहू जयंती करू साजरी शाहू जयंती करू…!!ध्रु!!
ज्ञान बंदीचा तोडला टाळा
काढील्या त्यांनी होस्टेल शाळा.
अधिकाराच्या अन माऱ्याच्या जागा काबीज करू..
सणा सम शाहू जयंती करू ||1||
तोच प्रणेता आरक्षणाचा,
उद्धारक तो बहुजनांचा…
राजर्षी ची न्याय पताका आम्हीच हाती धरू …
सणासम शाहू जयंती करू ||2||
कोल्हापूरचा भव्य परगना,
राबवित होता खऱ्या योजना.
राधानगरी उभारताना रोजगाराचा महामेरू
सणा सम शाहू जयंती करू ||3||
पुरणपोळी आणि गोड-धोड
नव्या कापडाची तयाला जोड..
रोषणाईने उजळू परिसर शाहूगाणी राहुलवाणी गात फिरू
सणा सम शाहू जयंती करू ||४||

– रचना : राहुल खांडेकर.