Tuesday, February 17, 2026
Homeसाहित्यशिकवण निसर्गाची

शिकवण निसर्गाची

कसे राहावे, कसे जगावे
जीवन फुलवित जावे
आयुष्याची वाट चालता
प्रमुदित मन व्हावे

बालपणी मज आई आजीने
शिकवण सुंदर दिधली
गोड गोड बोधकथा सांगूनी
नवीन दृष्टी दिधली

जीवन आपणा ज्याने दिधले
त्याचे गिरवित राहा तू धडे
निसर्ग निरखित राहा बायडे
त्यातून मिळतील धडे

उंचउंच गिरिराज चुंबिती
गगन ते निळेनिळे
कशी असावी गरुडभरारी
त्यातून मजला कळे

खोलखोल त्या द-या सांगती
नतमस्तक व्हावे
चिंतन मनन विवेकशक्तीने
प्रगल्भ वैचारिक व्हावे

खळखळ करुनि वेगाने त्या
निर्झरिणी वाहती
निर्मळ हास्ये बाल्य रमावे
निर्मळ व्हावी कृती

येवोत संकटे किती भ्रमणी
परी ना पथ सोडावा
मात करोनि ध्येयमार्ग परी
अपुला निश्र्चित गाठावा

स्वाती दामले

– रचना : स्वाती दामले. बदलापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मृदुला राजे on उज्ज्वल जीवन
Kavitha Tenny Nadar on झेप : 11