देवाने दिलेले दोन डोळे आपल्याला बाह्य जग दाखवतात. पण शिक्षण नावाचा तिसरा डोळा आपल्याला जगाचे सत्य आणि त्यामागील ज्ञान समजून घेण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या मुलाबाळांच्या जीवनात शिक्षणाचा दीप पेटवा, असे आवाहन नवी मुंबई महानगर पालिका समाज विकास विभागाचे समाज सेवक दशरथ गंभीर यांनी आदिवासी बांधवांना केले. यावेळी खारघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उप निरीक्षक सूरज जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनकर पवार, पोलीस नाईक विष्णू बेंडकुळी, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, ईश फाउंडेशन च्या अध्यक्षा कीर्ती मेहरा, सामाजिक कार्यकर्ते गणेश पेडामकर, आदर्श सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष गजानन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाळी सणाचे औचित्य साधून आदर्श सेवा भावी संस्था आणि ईश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर मधील घोळवाडी आदिवासी पाड्यात साडी चोळी, फराळ आणि कंदील वाटप कार्यक्रम १७ ऑक्टोबर रोजी पार पडला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सूरज जाधव उपस्थित आदिवासी बांधवाना मार्गदर्शन करताना म्हणाले, शिक्षण हे ज्ञानाचे साधन आहे.ते आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचवू शकते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. मी देखील आदिवासी कुटुंबातील आहे. शिक्षणामुळे पोलीस सेवेत काम करीत आहे. या पाड्यातून मुले शिक्षण घेवून चांगली नोकरी प्राप्त केल्यास पाड्याचा आणि आई वडिलांचा नाव लौकिक होईल. तसेच पाड्याच्या विकासाला आणि इतर मुलांना प्रेरणा मिळेल असे सांगितले.
तर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी आदर्श सेवा भावी संस्था गेल्या १९ वर्षांपासून आदिवासीबांधवा सोबत दिवाळी साजरी करीत असल्याचे ऐकून चांगले वाटलं.
तर पोलीस उप निरीक्षक दिनकर पवार यांनीही गरीबीवर मात करून आज स्वतः च्या पायावर उभे आहे ते केवळ शिक्षणामुळे त्या साठी जीवनात शिक्षण खूप महत्वाचे असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवारांच्या हस्ते जवळपास सत्तर कुटुंबियांना साडी, चोळी, फराळ, आकाश कंदील आणि मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास स्व. कु. सिद्धी गुरुनाथ ठाकुर मुर्बी, यांचे विशेष सहकार्य मिळाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश फाउंडेशन च्या आरती मेहरा, रवी कातकरी, नमिता कातकरी यांनी मेहनत घेतली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
