प्रख्यात चित्रकार शिल्पा निकम यांच्या जहांगीर आर्ट गॅलरी, (तिसरी गॅलरी) मुंबई, येथे भरलेल्या “ए फिनिक्स ऑफ होप” या एकटीच्या चित्र प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते काल झाले.
पहिल्याच दिवशी मान्यवरांनी आणि चित्र रसिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन येत्या २८ तारखेपर्यंत सुरू आहे.
अल्प परिचय
शिल्पा निकम यांचे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी निर्मला निकेतन आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले.
चित्रकलेतील मास्टर्स डिग्री प्राप्त केल्यानंतर खरं म्हणजे त्यांना चित्रकला प्राध्यापकाची चांगली नोकरी मिळत होती. पण चित्रकलेला पूर्ण वेळ देता येणार नाही म्हणून त्यांनी ही नोकरी नाकारली.
शिल्पा निकम यांची या पूर्वीही अनेक चित्र प्रदर्शने भरली आहेत. त्यांच्या चित्रकलेला जाणकार चित्रकला समिक्षकांनीही गौरविले आहे.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
उत्सर्फुर्तपणे यापुढेही सौ. निकम यांचे कडून चांगल्या चित्रकृती साकार व्हाव्या यासाठी शुभेच्छा.