पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील कृषी पदवीधरांची “शिवनेरी कृषी पदवीधर संघटना” गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. ही संस्था सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्यक्रम धडाडीने राबवत असते.
याचाच एक भाग म्हणून कृषी पदवीधर संघटनेतर्फे दरवर्षी कृषी क्षेत्रातील चतुरस्त्र व्यक्तीमत्वाला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.
हा पुरस्कार या वर्षी दूरदर्शनचे माजी उपमहासंचालक श्री. शिवाजी फुलसुंदर यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील प्रसार माध्यमातील बहुआयामी कार्याबद्दल देण्यात आला. हा पुरस्कार समारंभ नुकताच नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात संपन्न झाला.
शेतकऱ्यांच्या घराघरात पोहचून प्रचंड लोकप्रिय झालेला डी डी सह्याद्री वाहिनी वरील आमची माती, आमची माणसं हा कृषीविषयक कार्यक्रम ते डी डी किसान या फक्त शेती विषयाला वाहिलेल्या पहिल्या कृषी वाहिनीची उभारणी…….
महाराष्ट्राच्या कृषी माध्यमांना आकार देणारे शिल्पकार म्हणून त्यांनी आदर्श उभा केला आहे.
श्री फुलसुंदर यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘न्युज स्टोरी टुडे’ वेब पोर्टल तर्फे त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800