यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती हवाच.
हाच जाज्वल्य इतिहास प्रत्येकाच्या मनात टिकून राहावा म्हणून, चित्रकार श्री हरीश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच शिव राज्याभिषेकाचे भव्य चित्र भेट दिले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथज शिंदे, मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, आमदार मनीषाताई चौधरी यांची उपस्थिती होती.

श्री हरीश पाटील हे गेले एक वर्ष या चित्र प्रकल्पावर अथक मेहनत घेत होते. त्यातही गेले चार महिने सतत दिवस रात्र काम केल्यानंतर, हे चित्र यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. हे चित्र कॅनव्हास वर आक्रिलिक प्रिंट मध्ये काढण्यात आले आहे.
शिव राज्याभिषेकाचे इतके भव्य चित्र काढून ते मुख्यमंत्र्यांना भेट दिल्याबद्दल श्री हरीश पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
— टीम एन एस टी. ☎️9869484800