शुभ दीपावली ||🪔🏮
🏵️🪴🌈🎇🌠🌄🌅🌇🌆🎆🪔🏮🕯️🩸🎈🎁🎉
नमस्कार, मंडळी🙏
आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास न्यूजस्टोरीटुडे च्या टीम कडून अनेक हार्दिक शुभेच्छा 🪔🏮🕯️🕯🪔🏮
१ नोव्हेंबर २०२१ वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
२ नोव्हेंबर २०२१ धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
३ नोव्हेंबर २०२१ नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
४ नोव्हेंबर २०२१ लक्ष्मीपूजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
५ नोव्हेंबर २०२१ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
६ नोव्हेंबर २०२१ भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटीची जाओ..
🕯🪴 || शुभ दीपावली ||🕯🪴
🏵️
– टीम एनएसटी 9869484800