आम्ही विश्व लेखिकां, ठाणे शाखेतर्फे श्रावण आगमनाप्रित्यर्थ, नुकतीच ऑनलाईन अभिवाचन स्पर्धा घेतली गेली. ह्या स्पर्धेत जवळपास लेखिकां ४० स्पर्धकांनी भाग घेऊन, भरघोस प्रतिसाद दिला.
त्यातील १० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी केली गेली होती. अंतिम फेरीतील स्पर्धकांचे अभिवाचन ऑनलाईन घेऊन व्हाँईसगुरु श्री दिपक वेलणकर यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ असे पाच नंबर काढण्यात आले. त्यांना ग्रंथभेट देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात आम्ही विश्व लेखिकाच्या अध्यक्षा सौ पद्मा हुशिंग ह्यांनी गणेश वंदन आणि सरवस्ती पूजनाने केली.. सूत्र संचालन संस्थेच्या कार्याध्यक्षा संगीता चव्हाण आणि खजिनदार प्रतिभा चांदूरकर ह्यांनी केले.
संगीता चव्हाण ह्यांनी दोन्ही मान्यवर, व्हॉइस गुरू श्री दीपक वेलणकर आणि डॉक्टर क्षितिज कुलकर्णी ह्यांची ओळख करून देऊन स्पर्धेला सुरवात केली.
विशेष म्हणजे, अभिवाचन करणाऱ्या सर्वजणी उत्तम लेखिका आहेत. त्यांनी निवडलेल्या उताऱ्यात ही, साहित्य लेखनाचे विविध पैलू समोर आले..
तीस वर्षांपासून आवाजाचे प्रशिक्षण देणारे, प्रसिध्द व्हॉइस गुरू दीपक वेलणकर, ह्यांनी ह्या स्पर्धेचे परीक्षण केले. उच्चार आणि जोडाक्षर ह्यावर विशेष लक्ष देत, अभिवाचन कसे करावे, ह्या बद्दल त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले. आपण जे वाचतो, त्या भावना शब्दात उतरल्या पाहिजेत आणि ते नाट्य ही वाटता कामा नये हे बहुमोल मार्गदर्शन त्यांनी केले. तसंच अभिवाचनाची प्रॅक्टिस कशी करावी, त्या विषयी उपयुक्त माहिती ही दिली.

ह्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अजेय संस्थेचे संस्थापक डॉक्टर क्षितिज कुलकर्णी लाभले होते.
क्षितिज सरांनी स्त्री ही मोठी मातृशक्ती आहे, असं म्हणत, आम्ही विश्व लेखिकांचे कौतुक केले. येणारा पुढील काळ हा स्त्री शक्तीचा असेल, अजेय संस्थेची मदत कायमच आम्ही विश्व लेखिकाला असेल असं म्हणत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.

आम्ही विश्व लेखिकाच्या अध्यक्ष सौ. पद्मा हुशिंग ह्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, दोन्ही मान्यवरांनी विनंतीला मान दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
अभिवाचन स्पर्धेत, प्रथम क्रमांक – अलका वढावकर, द्वितीय क्रमांक – राजश्री भिसे, तृतीय क्रमांक मुग्धा फाटक, उत्तेजनार्थ – गीता सुळे, छाया पिंपळे यांनी पटकावला.
आभार प्रदर्शन कार्यवाह सौ मानसी जोशी ह्यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन कार्याध्यक्ष संगीता चव्हाण, कार्यवाह मानसी जोशी, कोषाध्यक्ष प्रतिभा चांदूरकर, सह कार्यवाह अलका दुर्गे, निमंत्रक अस्मिता चौधरी ह्यांनी अध्यक्ष सौ पद्मा हुशिंग ह्याच्या सहकार्याने केले होते.
– देवेंद्र भुजबळ, 9869484800
सुंदर उपक्रम 👌👌👌👌