Wednesday, July 2, 2025
Homeसाहित्यश्रावण मासात

श्रावण मासात

हिरव्या शेतान,
डोलारो फुलवल्यान,
रंगबेरंगी फुलान,
रांगोळी घातल्यान ॥१॥

पावसाच्या सरीन,
ऊनाक बोलवल्यान,
लपाछपीच्या खेळान,
पिकाक मोहरल्यान ॥ २॥

झाडा झुडपा,
पानान भरली,
गुलाब मोगरो,
फुलान बहारली ॥ ३॥

दुधाळ धुक्यान,
पांढरा आभाळ,
हिरव्या रानान,
थंडगार माळ ॥ ४॥

श्रावण मासात,
सृष्टी नटली,
सणवारी दिवसात,
घरादारा सजली ॥ ५॥

अळूच्या पानात,
नाग पूजलव,
रंगपंचमी सजवत,
टोपकापा केलव ॥ ६॥

उसाळलेल्या दर्यात,
श्रीफळ वाहवलव,
गाऱ्हाणा घालीत,
होडये लोटलव। ॥ ७॥

भयनीन भावाक,
राकी बांधल्यान,
प्रेमळ वचनाक,
भावान राखल्यान ॥ ८॥

कृष्णाच्या जन्मात,
पाळनो सजलो,
लोण्याच्या हंडयेत,
बाळगोपाळ रंगलो ॥ ९॥

श्रावणी सोमवारात,
शिवाक पूजलव,
अकंड मासात,
उपास धरलव॥ १०॥

वर्षा भाबल.

– रचना : सौ.वर्षा महेंद्र भाबल

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. धन्यवाद! महाडिक सर. आपला अभिप्राय वाचून खूप आनंद झाला.🙏

  2. मालवणी भाषेचा लहेजा घेऊन आलेली सुन्दर कविता.श्रावणाचं आरसपाणी वर्णन.

  3. धन्यवाद! महेंद्र सर,आपले अभिप्राय माझ्या लेखनास खास आहेत.

  4. धन्यवाद! आरोटे सर, कोकण बोली कशी वाटली?

  5. सुंदर मालवणी भाषेतील कविता. श्रावण महिन्यातील सणावारांच यथोचित वर्णन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४