इंदूर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक कलांनी बहरलेले व्यक्तिमत्व श्रीकृष्ण बेडेकर यांचा राज्यसभेचे उपाध्यक्ष, पत्रकार श्री. हरिवंश यांच्याहस्ते जाल सभागृहात नुकताच शाल व मानपत्र देवून भावोत्कट सत्कार करण्यात आला.
अल्प परिचय
श्री बेडेकर हे मुळात मुंबईकर. पण फार लहान वयात त्यांना इंदुरात स्थायिक व्हावे लागले.
श्री बेडेकर आयुष्यातील उदंड अडी-अडचणींमुळे एस्.एस्.सी. पलीकडे मजल गाठू शकले नाहीत; पण अंगभूत प्रतिभा, औत्सुक्य नि जिद्द या बळावर त्यांनी साहित्य, संगीत, कला, सुलेखन, संपादन, प्रकाशन, नाट्य, व्यवसाय क्षेत्रांत भरपूर कामगिरी बजावली असून आज वय वर्ष ७८ च्या घरातही त्यांच्यातले चैतन्य यथावत आहे.
दोन-तीन वर्षांपूर्वीही इन्दौर प्रेस क्लबने अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्त्कार केला होता. एक कर्तबगार पत्रकार म्हणून बेडेकरांचे नांव गोव्याहून प्रसिध्द झालेल्या विश्वचरित्र कोशाच्या सात खंडांपैकी तिस-या खंडात घेतले गेले आहे.
श्री बेडेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने
“इत्यंभूत” हा चरित ग्रंथ तयार असून २ वर्षांच्या कोरोनामुळे अद्याप त्याचे प्रकाशन होऊ शकले नाही.
श्री बेडेकर यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800.

खूप खूप अभिनंदन सुंदर कामगिरी आणि सुयोग्य व्यक्तिमत्त्वाला पुरस्काराचे मानकरी ठरवले खूप खूप सुंदर मराठी भाषा मध्यप्रदेश ( इंदोर) मध्ये रुजवून टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न सुफल सफल झाले 💐💐