Home बातम्या श्रीवर्धन : ‘नारीशक्ती’ बाबत मार्गदर्शन

श्रीवर्धन : ‘नारीशक्ती’ बाबत मार्गदर्शन

0

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई संचलित महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय, श्रीवर्धन येथे नुकतेच “नारीशक्ती वंदन अधिनियम” याबाबतीत मार्गदर्शन आयोजित केले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीवर्धनचे नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी ॲड. मालिका श्रीवर्धनकर यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले.

सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे यांनी उपस्थित दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर ॲड. मालिका श्रीवर्धनकर यांनी नारीशक्ती वंदन अधिनियम (संविधान १२८ वी दुरुस्ती अधिनियम २०२३) या अधिनियमा अंतर्गत महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळाले आहे या बाबतीत उपस्थित सर्व विद्यार्थिनींना व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले .

त्यानंतर नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांनी महिलांना मिळालेल्या हक्कांची योग्य ती अंमलबजावणी होण्यासाठी स्वतः महिलांनी पुढे येणे आवश्यक आहे असे अधोरेखित केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे यांनी अध्यक्षीय भाषणांतून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश चौगुले यांनी केले. ग्रंथपाल जास्मिन कदम यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version