एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ संचालित महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना समिती, रायगड पोलीस आणि शिवरुद्र अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच श्रीवर्धन येथील महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठगीत तसेच आदर्शाच्या प्रतिमापूजनाने करण्यात अली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीवर्धन च्या उपविभागीय पोलीस अधीक्षक सविता गर्जे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून दामिनी पथकाची माहिती दिली. स्वसंरक्षण शिबिरात शिकविल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिकांपैकी किमान एक प्रात्यक्षिक आपणाला स्वसंरक्षणासाठी आलेच पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना केले.

श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप पाटील यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
शिवरुद्र अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्री. शैलेंद्र ठाकूर यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे विविध प्रकार प्रात्यक्षित करून शिकविले. विद्यार्थिनींना नाविन्यपूर्ण शिकायला मिळत असल्याने त्यांच्यात एकच उत्साह होता.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, स्वसंरक्षण म्हणजे स्वतःचे रक्षण स्वतःच करणे आणि ते करीत असताना शारीरिक भाषा, आवाजातील चढ-उत्तर आणि स्वतःवरचा विश्वासही तितकाच महत्वाचा आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी सहा. प्रा. सुमित चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक सहा. प्रा. तृप्ती विचारे यांनी केले. तर आभार डॉ. योगेश लोखंडे यांनी मानले.

या प्रसंगी श्रीवर्धन पोलीस ठाणे दामिनी पथकाचे कांचन जवान, संगीत मुदामे, कृष्णा कदम, दादासाहेब खिलारी त्याचप्रमाणे अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थींनी मोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800