महाराष्ट्रातील नाथसंप्रदायाचे सर्वपरिचित संशोधक नगर येथील श्री.मिलिंद सदाशिव चवंडके यांच्या सिध्दहस्त लेखनीमधून साकारलेल्या || श्रीकानिफनाथमाहात्म्य || या ग्रंथास विविध प्रांतांमधील भाविकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अवघ्या २७ दिवसांत १००० प्रती हातोहात संपल्या आहेत. साध्या, सोप्या, रसाळ, शुध्द मराठी भाषेत ओवीबध्द लिहिलेल्या या ग्रंथामधील अध्याय भाविकांना अधिक भावले. त्यामुळे भाविकांच्या अपेक्षा वाढल्या असून विविध भाषेत हा ग्रंथ अनुवादीत करावा, अशी सुचना भाविकांकडून होत आहे.
भाविकांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी ग्रंथकार श्री.मिलिंद चवंडके यांनी || श्रीकानिफनाथमाहात्म्य || या मराठी ग्रंथाचा अनुवाद हिंदी, इंग्रजी, कन्नड व तेलगु भाषेत करण्याचा संकल्प केला आहे. या अनुवादाच्या कार्याने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, नेपाळ, गुजराथ, राजस्थान, केरळ, तामिळनाडू, तिबेट अशा भारतातील सर्वदूर प्रांतांमधील भाविकांना तसेच अमेरिका, युरोप या परदेशात गेलेल्या भाविकांना ग्रंथाचा लाभ मिळेल, असा विश्वास श्री.मिलिंद चवंडके यांनी व्यक्त केला.

नवनाथांमधील प.पू.श्रीकानिफनाथांच्या ग्रंथासारख्याच आठही नाथांच्या स्वतंत्र ग्रंथांची निर्मिती करून तेही ग्रंथ अशाच पध्दतीने पाच भाषांमध्ये भाविकांच्या हाती देण्याचा संकल्प श्री.मिलिंद चवंडके यांनी केला आहे.
ग्रंथनिर्मितीची वास्तू पावन क्षेत्र होणार
आजवरच्या नाथसंप्रदायाच्या इतिहासात प्रथमच नवनाथांच्या ग्रंथांचे स्वतंत्र लेखन घडणार आहे. पुणे शहराच्या परिसरात या ग्रंथ लेखनाचे अव्दितीय दैवी कार्य होईल, असे भाकित नाथयोग्यांकडून वर्तविले जात आहे. जेथे ग्रंथ लेखनकार्य घडले ती जागा अलौकीक ऊर्जास्तोत्राचे उगमस्थान म्हणून ओळखली जाईल. भारतासह परदेशातील भाविकांचे श्रध्दास्थान ठरेल.
या ऐतिहासिक दैवी नाथकार्याचे महत्व लक्षात घेऊन कोण दानशूर भाविक रमणिय परिसरातील जागा दान करण्याचे पवित्र पुण्यकार्य करेल, याबद्दल नाथभक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
आपण या ग्रंथनिर्मितीच्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार रहाणार आहोत या सद्भावनेने नाथभक्तांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800