सिध्द होण्या काम
स्मरु नित्य नाम
सद्गुरू नाम
श्रीसमर्थ ।।
सुयोग्य विचार
करावा मनात
प्रेरणा देतात
श्रीसमर्थ ।।
करावे नेहमी
चिंतन मनन
करिती कल्याण
श्रीसमर्थ ।।
भक्तांचे आपल्या
रक्षण करिती
संकटी धावती
श्रीसमर्थ ।।
— रचना : अरुण वि.देशपांडे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800