एकांतात जखमा देणारे हात
चारचौघांत मलमपट्टी करत होते
लोकांच्या नजरेत तेच
करुणेची देवता ठरत होते
लाख इच्छा असेल माझी
सात जन्म हाच पती मिळावा
पण नाही पुजले मी वडाला
म्हटलं त्याच्या इच्छेचाही मान राखावा
कौतुक करत होते लोक
पिंजरा तो सोन्याचा होता
घुसमटलेल्या जीवासाठी
आजन्म तो बंदिवास होता
अंतरीच्या वेदना मी
कोणत्या भाषेत मांडू ?
उमटतील पडसाद असे मी
शब्द कुठून शोधू ?
आवडले असते तुझ्या आयुष्यात
इंद्रधनुषी सप्तरंग उधळायला
तू अवसरच नाही दिलास
रातराणीचा गंध होऊन दरवळायला

– रचना : आसावरी घोलप.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800
खूप सुंदर…
धन्यवाद सर 🙏
कवितेचा विषय एकच असेल तर, पहिले कडवं आणि आणि दुसऱ्या कडव्यापासून पुढे याचा संदर्भ एक कसा आहे हे मला समझवाल का?
पहिले कडवं खूप मार्मिक वाटले
नमस्कार सर …ती एक कविता नसून वेगवेगळ्या पाच चारोळ्या आहेत. एडिटरकडून नजर चुकीने **माझी चारोळी*** हे शीर्षक देणे राहून गेले. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
नमस्कार सर…. ती एक कविता नसून पाच वेगवेगळ्या चारोळ्या आहेत. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
नमस्कार सर… ती एक कविता नसून पाच वेगवेगळ्या चारोळ्या आहेत
बाईच्या अंतरंगात सलणारी वेदना मांडताना तिच्यातला बाणेदारपणा अधिक भावतो.
कविता आवडली.
.
माझ्या चारोळ्यांवर दिलेल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद सर…