पहाट होण्यापूर्वी
कुणी बांधव,
अल्लाकडे दुवा मागतो…
समोरच्या घरातील
कुणी भक्त,
नित्यनेमाने शंखनाद करतो,
काकुळतीने परमेश्वराची
करुणा भाकतो,
आपापल्या परीने,
प्रत्येक जण,
सर्वव्यापी, सर्वसाक्षी, जगन्ननियंत्याला,
साद घालतोय, कोणाच्यातरी आर्जवाला,
दाद मिळू दे,
आणि अखिल मानवजातीवरचे
भयानक संकट,
एकदा टळू दे ।
– रचना : सुरेखा पाटील.
Khup chaan…