आज, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा.
गजमुख विराजते
तुंदील तनुवर
लंबोदरी शोभते
पिवळा पितांबर
एकदंत शुर्पकर्ण
मूर्तीमंत धूम्रवर्ण
गौरीपुत्र विनायक
पूर्ण सिध्दी निसंशय
रूप ओंकार
दिव्य साक्षात्कार
सुख अपार
दुःख आधार
कार्यारंभी पूजन
सृजनाचे आंदण
नादब्रह्म गुंजन
भक्तीचे साधन
अष्टविनायक दर्शन
साग्र संगीत वर्णन
अथर्वशीर्ष भजन
गणेशला वंदन
चतुर्भुज प्रतिमा
नामाचा महिमा
पुण्याई व्रताची
पूर्व संचीताची
मनाचा सुसंवाद
मानाचा प्रतिसाद
घेऊ आशीर्वाद
तोच देवाचा प्रसाद
— रचना : मीरा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800