Monday, October 20, 2025
Homeयशकथासंजीवन : उच्च अधिकार्यांकडून कौतुक

संजीवन : उच्च अधिकार्यांकडून कौतुक

“संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प” या विषयी आपल्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेबपोर्टलवर १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमाची दखल अहमदनगर जिल्हा परिषदेचे गुण ग्राहक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आयएएस यांनी देखील घेतली आहे. कल्पक, कष्टाळू, विद्यार्थी हितप्रेमी विस्तार अधिकारी श्री संजीवन दिवे यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
– संपादक

नगर जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून राहता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने इंग्रजी वाचन करावे यासाठी “संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प” सुरू केला आहे. हा प्रकल्प कमी कालावधीत विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये लोकप्रिय झाला आहे.

या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन करायला कसे शिकवायचे ? याचे प्रात्यक्षिक संजीवन दिवे स्वतः विद्यार्थी व शिक्षक यांना एकत्रित घेऊन करून दाखवितात. श्रवण, भाषण, वाचन, लेखन या भाषा कौशल्यावर आधारित हा उपक्रम असल्याने तो चांगलाच यशस्वी होत आहे.

अधिकारी स्वतः हातात पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करतात ही अचंबित करणारी बाब आहे. संजीवन दिवे यांच्या या संकल्पनेतून विद्यार्थी व शिक्षक यांना प्रेरणा मिळत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचा दररोज इंग्रजी वाचनाचा सराव घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी वाचनाची गोडी व आवड निर्माण झाली आहे. ते आनंदाने इंग्रजी वाचून दाखवत आहेत. घरी गेल्यानंतर विद्यार्थी पालकांकडूनही इंग्रजी वाचण्यासाठी सहकार्य घेत आहेत.

संजीवन दिवे शाळा भेटी व मार्गदर्शन करताना जे विद्यार्थी चांगले इंग्रजी वाचन करतात त्यांचा इंग्रजी वाचनाचा व्हिडिओ स्वतः मोबाईल मध्ये काढतात व तो स्वतःच्या मोबाईल स्टेटसला ठेवतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन स्टेटस पाहून अनेक ठिकाणावरून त्यांचे अभिनंदन होत असते.

यातूनच संजीवन दिवे यांना या प्रकल्पाचा प्रसार व प्रचार करण्याची संकल्पना सुचली. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचण्याचे व्हिडिओ काढून स्वतःच्या मोबाईल स्टेटसला ठेवत आहेत. गावातील नागरिक,नातेवाईक, मित्रमंडळी मोबाईल स्टेटसवर विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचण्याचे व्हिडिओ पहात आहेत. या प्रकल्पामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये माझा स्टेटस ठेवला जाणार यातून इंग्रजी वाचनाची चढाओढ लागली.

संजीवन दिवे यांनी अनेक शाळांमध्ये पालक सभा घेऊन, आपल्या पाल्याच्या शिक्षणामध्ये पालकांनी त्यांचा अभ्यास प्रबोधन करत आहेत. पालक सभांमध्ये संजीवन दिवे यांनी मार्गदर्शन करावे अशी मागणी पालक व शिक्षक वर्गातून येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते. माझा इंग्रजी वाचनाचा व्हिडिओ तयार करून माझ्या शिक्षकांनी त्यांच्या स्टेटस् ला ठेवावा.

या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरणा मिळून टप्प्याटप्प्याने शंभर टक्के विद्यार्थी इंग्रजी वाचन करण्याचा सराव करत आहेत. या प्रकल्पामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील समन्वय वाढला आहे. पालक क्रियाशील होत आहेत. इंग्रजी वाचनाचा स्टेटस ठेवल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षण विभागाची प्रतिष्ठा वाढत आहे.

जिल्हा परिषद शाळांबद्दल गावातील नागरिकांमध्ये चांगला संदेश जात आहे. विद्यार्थी शिक्षक, पालक यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे. संजीवन इंग्रजी वाचन उपक्रम एक दिशादर्शक प्रयोग संजीवन दिवे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून यशस्वी करून दाखविला आहे.

“संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प” हा यूट्यूब चैनल सुरू केलेला आहे. राहता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इंग्रजीमध्ये प्रगतीपथावर दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पाया पक्का होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये जाणीवपूर्वक दर्जेदार शिक्षण मिळण्यास प्रोत्साहन मिळत आहे. एका शिक्षकाचा उपक्रम पाहून अनेक शिक्षक प्रेरित होताना दिसून येत आहेत.

राहता तालुक्यातील 337 शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, अधिकारी यांच्यातील दरी कमी होऊन शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण सुरू होत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थी व शिक्षकांना एक प्रकारची इंग्रजी वाचनाबाबत दिशा मिळाली आहे. लहान लहान विद्यार्थ्यांचे व पालकांचे गावात कौतुक होत आहे. इंग्रजी वाचन शिकण्यासाठी विद्यार्थी स्वतःहून पुढे येत आहेत. आपणही उत्तम इंग्रजी वाचू शकतो. हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्व खुश आहेत. या प्रकल्पाची विशेष दखल जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी घेऊन समाधान व्यक्त केले. अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर, आय ए एस यांनी शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अभिनंदनपर पत्र दिले आहे. या प्रकल्पाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

– टीम एनएसटी ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. दिवे सरांचे इंग्रजी वाचन पद्धत खूप विद्यार्थ्यांचे भिवी्तव्य उज्वल बनऊ शकेल. सर्वांना शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप