संत गाडगेबाबा यांची आज जयंती आहे. या निमित्त हा विशेष लेख…..
मानवतेचे नंदादिप असणाऱ्या गाडगे बाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. या दिवशी ईश्वरी रुप,थोर मानव आणि सगळ्यांंचे भले व्हावे या हेतूने एक देवदूत या पृथ्वीतलावर धाडला तो गाडगेबाबांच्या रूपानेच.
गाडगे बाबांचे नाव डेबुजी. त्यांचे वडील व्यसनापायी निधन पावले. त्यामुळे डेबूजी आपल्या आई समवेत मामाच्या गावी दापुरे येथे लहानाचे मोठे झाले. मामाच्या गावी खूप काबाड कष्ट करून त्यांनी सावकाराकडे असलेली मामाची शेती मोठ्या शक्ती युक्तीने लढून मामाच्या स्वाधीन केली आणि मामाचे मन जिंकले.
बालपणापासूनच बहादुर डेबूजीचं 1892 साली लग्न झालं. त्यांच्या पत्नीचे नाव कुंताबाई. त्यानंतर दोन कन्यारत्नांना जन्म दिला. एके दिवशी एक साधू गावात आला त्यांचा डेबुजी ना लळा लागला. साधू डेबूजीच्या गैरहजेरीत गाव सोडून निघून गेला. डेबूजी हे आपली आई, गर्भवती पत्नी, दोन कन्या यांना सोडून घराबाहेर पडले. अंगावर चिंध्या पांघरून हातात खराटा, डोक्यावर खापराचा तुकडा, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात बांगडी, दोन पायात दोन वेगवेगळ्या चपला अशा अवतारात ते गावोगाव हिंडत.
दिवसभर गावच्या गाव स्वच्छ करायची ती खराट्याने रात्री मात्र लोकांची मने स्वच्छ करायची ती कीर्तनाने ! संसार सोडून कधी बुद्ध होऊन शांतीचा मूलमंत्र देणे तर अभंग कीर्तनातून ज्ञानोबा-तुकोबा होणे साधुत्व दैवत्व महत्व जोडणारा अवलिया म्हणजे गाडगेबाबा. संस्कृती व श्रमसंस्कृती बाबांनाही नांदत होती मानव कल्याण व जनजागृती समाज प्रबोधनासाठी ते अहोरात्र तहानलेल्या पाणी व केल्यास अन्न बेघरांना घर बेकारांना काम यांना बळ, मुक्या प्राण्यांना दया देणे ही बाबांची शिकवण होती.
सुखात संतांची वचने परोपकारी बाबा नेहमी शेतावर जा कुळव नांगर ओढ कुंभाराच्या भट्टी वर माती तुडव. कोणी कुष्ठरोगी दिसला की त्यास चोळून माखून आंघोळ घालत. नाव विचारले की म्हणत मले मालूम नाही. जात विचारले की माणूस. कामाला येतोस का पगार काय घेणार दहा लाख असे विनोदी बोलत. देवळाभोवती साफसफाई करत. कोणी विचारलं तर म्हणत की आज राती कोण्या बुवाचा किर्तन हाय. दगडाचे टाळ घेऊन देवकीनंदन गोपाला सुरेल भजनात सारा गाव दंग होई.
दुसऱ्या दिवशी उठावं दुसऱ्या गावाला जावं, झाडाखाली झोपावं मिळेल ते खावं साऱ्यांना वाटावं. असे हे बाबा. ज्ञान संस्कृतीचे प्रचारक, लोकसंस्कृतीचे उपासक होते आणि खरे समाजसुधारक होते. विनोद व विचारांची गुंफण त्यांचे किर्तन असे लोकांच्या डोळ्यात अंजन घालीत. भ्रष्टाचार, हुंडाबंदी, व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, अमानुष रूढी, हुंडाबंदी स्वच्छता, शिक्षण, सामाजिक सुधारणा याविषयी खूप जनजागृती करीत.
त्यांनी आयुष्यभर माणसे जोडली. संस्था उभारल्या आणि समाजाची, रंजल्या गांजल्या ची या देवदूताने मनोभावे निस्पृह, निरपेक्ष सेवा केली. श्रमप्रतिष्ठा, मानवता, संवेदनशीलता, राष्ट्रनिष्ठा मूल्य जपणारे हे देवदूत अंधश्रद्धा निर्मूलन अज्ञाना विरुद्ध बंड दीनदलित लोकांची सेवा, शिक्षणाचा प्रचार, स्वच्छता निर्मूलन, दुबळ्यांची, अनाथ अपंगांची सेवा, माणसात देव शोधणारा संत, अनिष्ट चालीरीती रूढींना आपल्या कीर्तनाद्वारे संपुष्टात आणण्यासाठी लोकांना त्यांच्या अज्ञान दुर्गुण आणि दोषांची साध्या सोप्या सहज भाषेत कीर्तनातून जनजागृती प्रबोधन करणारे हे थोर संत व्यसनमुक्ती, कर्जमुक्ती, प्राण्यांची हत्या रोखणे, भ्रष्टाचार रोखणे, जातिभेद रोखणे, अस्पृश्यता निर्मूलन करणे अशा समाजोपयोगी अनंत कार्यातून निरपेक्ष निस्वार्थ सेवा देणारे असे हे देवदूत 20 डिसेंबर 1956 रोजी अनंतात विलीन झाले.
असे संत महात्मा देवदूत पुन्हा होणे नाही. “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” संत गाडगेबाबांना शतशः वंदन. 🙏
– लेखन : पूर्णिमा शिंदे.
आकाशवाणी निवेदिका, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खरोखरच गाडगेबाबा म्हणजे देवाचे दूतच…