Home बातम्या संत जनाबाई नी स्त्री मुक्तीचा हुंकार भरला -प्रा.डॉ.सतीश यादव

संत जनाबाई नी स्त्री मुक्तीचा हुंकार भरला -प्रा.डॉ.सतीश यादव

0

संत जनाबाई नी स्त्री मुक्तीचा हुंकार भरला – प्रा.डॉ.सतीश यादव

गंगाखेड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात श्री संत जनाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलत असतांना संत जनाबाई नी १२ व्या शतकात स्त्री मुक्तीचा हुंकार भरला, असे गौरवोद्गार प्रा.डॉ.सतीश यादव यांनी काढले.
    
प्रा.डॉ.सतीश यादव यांनी संत जनाबाई यांची समकालीन परिस्थीती विशद करतांना अध्यात्मिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक, वर्ण व्यवस्थेचा ऊहापोह केला. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचे संघटन केले. धार्मिक क्षेत्रात अध्यात्मिक समता प्रस्थापित करून लोकमांगल्याचा ध्यास घेतला. पुढे त्यांनी संत जनाबाईंच्या जीवन चरित्र व साहित्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, संत मुक्ताबाई, संत विठाबाई, संत सोयराबाई, इ.महिला संतांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय संत जनाबाई होत्या.

त्यांनी ओव्या, भारुंड, अभंग, काव्य रचना करून आपल्या सृजनशील प्रतीभेचा परिचय दिला. तत्कालीन परिस्थीतीत स्त्रियांना शूद्रातिशूद्र मानले जायचे. म्हणून संत जनाबाईंनी आपल्या साहित्य प्रतीभेच्या माध्यमातून अहंकारी पुरूष व्यवस्थेच्या विरुद्ध बंड केले. परिवर्तनाचा विचार अत्यंत आक्रमक, विद्रोही पद्धतीने लोकांसमोर मांडला. देवाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. आम्ही सुध्दा व्यवस्थेचा घटक आहोत हे दाखवून दिले. संत जनाबाईंनी स्त्री स्वातंत्र्याचा एल्गार बौद्धिक, भावनिक पध्दतीने केला. थोडक्यात संत जनाबाई पुरुषी अहंकारा पासून स्त्री मुक्तीची कामना करते.
    
या प्रसंगी संस्थेचे सचिव ॲड.संतोष मुंढे यांनी गंगाखेड येथील संत जनाबाई प्रतिष्ठान प्रगतीच्या दिशेने कशी वाटचाल करता येईल या संबंधी मत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ.दीनानाथ फुलवाडकर यांनी, “विद्रोह म्हणजे  नवनिर्मिती होय” असे विचार मांडले.

प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष डॉ.आत्माराम टेंगसे व संचालक केरकर हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.बी.एम.धूत यांनी, सूत्र संचालन व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.एम.डी.इंगोले व आभार प्रा.डॉ.सतीश डोंगे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्रचार्य त्रय-“डॉ.दयानंद उजलंबे, डॉ.चंद्रकांत सातपुते, प्रा.संतोष गायकवाड, जवादे मामा, भारत हत्तीअंबीरे, शिक्षक व प्रशाकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version