Wednesday, July 2, 2025
Homeबातम्या'संत सावता माळी : अभंग आणि विचार' पुस्तक प्रकाशित

‘संत सावता माळी : अभंग आणि विचार’ पुस्तक प्रकाशित

सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषा विभाग प्रमुख प्रो.डाॅ.सौ.सुवर्णा चव्हाण – गुंड लिखित पुस्तकाचे प्रकाशन महामंडलेश्वर मनिषानंद महाराज पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री मा. छगन भुजबळ, आयोजक गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर आदींच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत सावता महाराजांच्या विचारांची, कर्मयोगी जीवननिष्ठेची उदाहरणे दिली.सावतोबांच्या कृतिशील विचारांची आज नितांत गरज असल्याचे विचार मांडले.

आयोजक मा.अतुल सावे यांनी आपल्या कृती आणि उक्तीप्रमाणे सावतोबांच्या विचारांची आधार शिला उभारली. मा.छगन भुजबळ यांनी ,’ संत सावता माळी : अभंग आणि विचार ‘ या पुस्तकाचं मनःपुर्वक स्वागत केले.

संत सावता माळी यांच्या प्रत्येक पैलूंचा संशोधनात्मक रितीने प्रो.डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण या लेखिकेने परामर्श घेतला आहे. उदा. संत सावतोबांनी पर्यावरण, शेतीची पद्धती, आरोग्यासाठीचे विचार, औषध तयार करणं, मानसिक आरोग्य, सात्विक जीवन पद्धती, जीवनशैली, निष्ठा.. इत्यादी अनेक पैलूंवर सखोलपणे मांडणी केली आहे.

याप्रसंगी सौ.रुपाली चाकणकर व मान्यवरांनी, ‘संत सावता माळी अभंग आणि विचार’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भरभरून सदिच्छा व्यक्त केल्या. अनेक राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा दिल्या.

मा.सावता वसेकर महाराज, मा. प्राचार्य सावता घाडगे, चित्रकार सावता घाडगे, प्रकाशक धनंजय चव्हाण, डॉ. संजय गुंड, प्रभु महाराज तुळशीकर , वसेकर महाराज, उपस्थित तमाम जनसमुदायातुन अनेकजण सावतोबांच्या भक्तीने, निष्ठेने विचार जाणून घेतले या विचारांची आज अत्यंत गरज असल्याने विचारांची देवाणघेवाण झाली.’ संत सावता माळी:अभंग आणि विचार’, चा प्रकाशन सोहळा भक्ती निवासाच्या कोणशिला उद्घाटनप्रसंगी सावतोबांच्या अरण नगरीत थाटात संपन्न झाला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४