सुयश क्लासेस आवरे व निगा फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे सर्व वयोगटासाठी खुली ऑनलाईन निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
निबंध स्पर्धा विषय “कोरोना एक जागतिक महामारी व सुरक्षित उपाय”, चित्रकला स्पर्धा विषय- “जलसंवर्धन ही काळाची गरज” व वक्तृत्व स्पर्धा विषय- “वने, वन्यजीव व त्यांचे संरक्षण ही एक जबाबदारी” असे विषय आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्याचा कालावधी २४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ राहील. तर ०२ नोव्हेंबर २०२१ रोजी बक्षीस वितरण समारंभ होईल..
प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ असे पारितोषिके देऊन स्पर्धकांचा संस्थेच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जाईल. निबंध पीडीएफ फाईल, चित्र पीडीएफ फाईल तसेच व वक्तृत्व ध्वनीफीत ही 4 मिनिटे एडिट करून दिलेल्या परिक्षकांच्या मोबाईलवर पाठवावी.
श्री निलेश गावंड सर (9768041430) अध्यक्ष-निगा फाऊंडेशन.
श्री निवास गावंड सर (9221345869) अध्यक्ष-सुयश क्लासेस आवरे, निबंध परीक्षक-सौ.उर्मिला म्हात्रे मॅडम (8108840650). चित्रकला परिक्षक
श्री संतोष गावंड सर (9819924292), वक्तृत्व स्पर्धा परीक्षक श्री.रविंद्र पाटील सर (8793456854), श्री.नागेंद्र म्हात्रे सर, अध्यक्ष-सारडे विकास मंच (9833552403), श्री. आकाश घरत सर, माजी नेहरू युवा स्वयंवसेवक, श्री राकेश पाटील सर (9664770708) साईकृपा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी चे सर्वेसर्वा, यांच्या मोबाइल क्रमांकावर आपली पीडीएफ अथवा वक्तृत्व चित्रफीत पाठवावी.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

– लेखन : निवास गावंड
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800