स्वप्न होते की सत्य होते
प्रीतीचा मधुमास होता
फक्त वसंत फुलून होता
प्रेमिकांचा दास होता …
कमलदले मधुमालतीची
मोहमयी आरास होती
लाजणारी कृष्णकमळे
मोगरा कंकण हाती…
धुंद होते रान सारे
बटा उडवित वारा
काजळाला अर्थ होता
पदर उडवी पसारा…
आसवांना आस होती
प्रीत गात्रातूनी फुले
नयन बावरे सुखाचे
पायी पैंजण ही झुले …
आता फुले गुलमोहराची
पळस पांगारा कधी
ओढ आता निर्झराची
आता कशाला उदधी ?

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
माझ्या साठी ‘उदधी’ हा शब्द नवीन आहे. त्याचा अर्थ कळवा. कविता छान 🙏
सुमती ताई मनापासून आवडतं