नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयाच्या हिंदी विभागा द्वारे ‘संवाद लेखक से’ उपक्रमांतर्गत आयोजित अनोख्या कार्यक्रमात श्री संत जनाबाई महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख व प्रसिद्ध लेखक प्रा.एम.डी.इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रस्तुत उपक्रमाचा हा चौथा भाग भाग होता. या पूर्वी डॉ.सुनिल जाधव, डॉ.रमेश कुरे, डॉ.दामोदर खडसे यांना पाचारण करण्यात आले होते. प्रा.डॉ.इंगोले यांचे आता पर्यंत ‘तू चॉंद बनकर रह गईं’ काव्य संग्रह, ‘हिंदी साहित्य विविध विमर्श’, ‘कथाकार बदीउज्जमाँ, ‘आंबेडकरवादाचा भाष्यकार महाकवि वामनदादा कर्डक’, ‘भारतीय परिवर्तनवादी चिंतन परंपरा और हिंदी साहित्य’, ‘धरती आबा’ असे एकूण ९ ग्रंथ प्रकाशित आहेत. तीन ग्रंथ प्रकाशनाधिन आहेत.
त्यांच्या ‘यादों के झरोखे से’ या आत्मकथेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्य स्तरीय पुरस्कार, श्रीपाल सबनीस (अ.भा.म.सा.सं.अध्यक्ष) हस्ते, ‘मराठवाड़ा के आंबेडकरी जलसाकार’ संशोधनाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार, आर्य नागार्जुन सुराई ससाई, प्रसिद्ध पत्रकार निखिल वागले यांच्या हस्ते ‘ज्ञानकिरण पुरस्कार’, ‘सुषमा अंधारे यांच्या हस्ते ‘समाज भूषण पुरस्कार’ असे एकूण 18 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

प्रा. इंगोले यांनी ‘रचना प्रक्रिया’ या विषयी विस्ताराने चर्चा केली. समकालीन संदर्भाने साहित्यिकांची भूमिका, जबाबदारी, सामाजिक प्रतिबध्दता, कर्तव्य काय असते या अनेक साहित्यिकांची उदाहरणे देऊन या विषयी सविस्तर विवेचन केले. त्यांनी आपल्या मनपसंद काही रचनाही सादर केल्या. विद्यार्थींनी व विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. हिंदी भाषेचे महत्वही पटवून दिले व साहित्य लेखनाचे अवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रावसाहेब जाधव यांनी हिंदी भाषा व साहित्यावर प्रकाश टाकला. तसेच हिंदी रोजगार प्राप्तिचे कसे साधन आहे. या वर संबोधन केले. कार्यक्रमाचे संयोजक व हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.भगवान जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. तर सूत्र संचालन डॉ.वर्षा मोरे व आभार डॉ.भीमराव घोडगे यांनी मानले. या प्रसंगी प्रसिद्ध विचारवंत डॉ.अनंत राऊत व डॉ.डी.एन.मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ.वाजिद सैयद, डॉ. प्रीति यादव, डॉ. पठाण मैडम यांनी महत्वाची भूमिका निभावली.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संखेने यू.जी,पी.पी. व संशोधक विद्यार्थी विद्यार्थींनीची उपस्थिती होती.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800