Wednesday, June 18, 2025
Homeबातम्यासंवेदनशील प्रांजल

संवेदनशील प्रांजल

पुणे महानगपालिकेच्या स्थायी समितीचे सलग ४ वर्षे अध्यक्ष राहिलेले श्री हेमंत रासने यांचा वाढदिवस १३ एप्रिल रोजी असतो. हा वाढदिवस त्यांचे कार्यकर्ते, चाहते नेहमी धूम धडाक्यात साजरा करतात. पण आमदार मुक्ताताई टिळक आणि खासदार गिरीशभाऊ बापट यांच्या निधनामुळे यंदा वाढ दिवस साजरा न करण्याचा निर्णय श्री हेमंत रासने यांनी घेतला. तसेच नेहमी प्रमाणे वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.

श्री हेमंत रासने यांच्या संवेदशीलतेने सातारा येथील बाल चित्रकार प्रांजली उल्हास हेडे चांगलीच भारावून गेली. म्हणून वाढदिवस साजरा न करणाऱ्या या लोक नेत्यास तिने स्वतः त्यांचे रेखाटलेले पेन्सिल चित्र पुणे येथे भेट दिले. प्रांजल ने स्वतः रेखाटलेले चित्र पाहून श्री हेमंत रासने भारावून गेले.

यावेळी प्रांजल चे आई वडील, श्री कालिका देवी संस्थान चे अध्यक्ष आनंद डांगरे, पुणे जिल्हा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अचलारे, विद्यमान अध्यक्ष रमाकांत कानडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत कासार, न्यूज स्टोरी टुडे चे देवेंद्र व अलका भुजबळ, विविध मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रांजल च्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…