Wednesday, June 18, 2025
Homeबातम्यासक्सेस स्क्वेअरचे यश

सक्सेस स्क्वेअरचे यश

पुणे येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या सभासदांच्या एकजुटीमुळेच सक्सेस स्क्वेअर सोसायटीचा दिमाखदार प्रकल्प उभा राहू शकला आहे. या प्रकल्पातील नियोजित विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही प्रकल्प विकासक व सारथी समुहाचे संचालक विजय मुंडे यांनी नुकतीच दिली.

कोथरुड येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या ‘स्वप्नपूर्ती’ या कोनशीलेचे अनावरण आणि सक्सेस सभागृह, अत्याधुनिक जिम आणि बाल क्रीडांगणाचे उद्धघाटन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे आणि विकासक विजय मुंडे यांच्या उपस्तिथीत झाले. त्यावेळी सभासदांशी संवाद साधताना मुंडे यांनी हे आश्वासन दिले.

विविध कायदेशीर अडथळे आणि करोनाचे संकट यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला. परंतु, दोन्ही सोसायट्यांचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केल्यानेच हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला, असेही ते म्हणाले.

कर्वे रस्त्यावरील मधुवंती आणि लक्ष्मीनारायण पार्क सोसायट्यांच्या पुनर्वसन योजनेतून सक्सेस स्क्वेअर हा गृहप्रकल्प उभा राहिला आहे. त्याच्या स्वप्नपूर्ती समारंभास आठवणीने बोलाविल्याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोसायटीच्या अध्यक्षांचे आभार मानले.

सुतार, खर्डेकर व भावे यांनी यावेळी बोलताना सोसायटीचे प्रश्न व नागरिकांच्या समस्या सोडविण्यास आपण सर्व ते सहकार्य देऊ असे आश्वासन दिले.

वाढत्या धकाधकीच्या जीवनात नियमित व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे. सोसायटीतील जिम त्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरणार असून रहिवाशांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी या सुविधेचा चांगला उपयोग करून घ्यावा, अशी अपेक्षा अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.

सोसायटीचे सचिव प्रदीप काजळे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष नागेश नलावडे यांनी सोसायटी पुनर्वसन प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा घेताना त्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांबद्दल ऋण व्यक्त केले. श्री. विठ्ठल रायरीकर यांनी आभार मानले.

सुनील कडूसकर

– लेखन : सुनील कडूसकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?