Monday, February 16, 2026
HomeUncategorized"सखा - तारणहार"

“सखा – तारणहार”

सखा सहकारी खास
शब्दा मध्ये दडे अर्थ
सुख दुःखाचा सोबती
मनी नसे काही स्वार्थ

अडी नडीच्या काळात
धाव घेई पदोपदी
कोणी नको देवो साथ
संकटात उभा आधी

सखा उभा राही पाठी
बंधू असो नसो नाती
नि:स्वार्थाचे कार्य नेक
मदतीचा हात हाती

विश्वासास होता पात्र
करी भावना व्यक्त
मदतीचा हात तारणहार
करी तो सहज मुक्त

बंधू भावांनो मागणे एक
सारे हात व्हावे एकत्र
गरजवंताचे तुम्हीच गोत्र
सखा होण्यास व्हा पात्र

– रचना : गणेश साळवी
इंदापूर – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ
☎️9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11