मधुसिंधू काव्य
~~~~~~~~~~
मैत्रीचे नाते
माझे सजीवाशी
कुत्रा मांजराशी
चराचराते
चिमण्या काऊ
येतात दारात
दाणे टिपतात
तो देते खाऊ
नाते जुळले
भाव भावनांचे
ते एकमेकांचे
बोल जाणले
मैत्री श्वानाची
निस्वार्थ निखळ
प्रेमाचे ओघळ
जिवाभावाची
प्राणी हे मूक
नयने वदती
संवाद साधती
प्रेमाची भूक

– रचना : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका
अरुणा मुल्हेरकर यांची पक्षी प्राण्यांविषयी आस्था दाखवणारी
मैत्रीचे नाते हे मधुसिंधु काव्य छानच…
चराचरावर प्रेम करा ..असा संदेश देणारी