Friday, November 22, 2024
Homeसाहित्यसगळं तुम्ही करा !

सगळं तुम्ही करा !

आम्ही कसेही वागू,
सगळं तुम्ही करा,
आम्ही फक्त आमुचे पाहू,
देशाचा विचार तुम्ही करा,

थोडीही न वापरता बुद्धि,
कुणीही बहकावते आम्हा कसे ?
जो जे चांगले करतो,
त्याच्या मागे का कुणी नसे ?

हीच वृत्ती राहीली तर मग,
पुन्हा गुलामी करा कुणाची,
आत्मभान सोडले त्यांनी,
भाषा न करावी अभिमानाची,

भव्य दिव्य काही होण्यास,
त्याग काहींना करावा लागे,
देश मोठा होऊ दे माझा,
स्वार्थ सोडू, हे रूजवावे लागे…!!!

हेमंत भिडे

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. ‘आम्ही कसेही वागू ‘अशी वृत्ती काय परिणाम करू शकते हे सांगणारी सुरेख रचना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments