षडाक्षरी काव्य रचना
भारतीय देश
सणांचे महत्व
बंधूभाव छान
सुंदरसे तत्व
बारमाही सण
फारच गोडवा
नव वर्ष नाव
शोभतो पाडवा
गोड भोजनाने
होते सुरुवात
गुढ्या नि तोरणे
दिसे मांगल्यात
संक्रांती पासून
कुंकू हळदीचे
वाण देणे घेणे
दिस आनंदीचे
एकमेका देती
फुलांचा गजरा
मुखी भाव असे
गोंडस हसरा
होळी सणा होई
पुरणाची पोळी
सांजेला नैवेद्य
तम भाव पोळी
रंगपंचमीला
धुराळे अंबरा
नानाविध रंग
खेळाच्या झुंबरा
आषाढ मासात
वडास पूजती
दीर्घायुष्यासाठी
प्रार्थना करती
श्रावण मासास
राजा मानतात
मंगळागौरीला
शिव पूजतात
नागपंचमीला
नागोबाची पूजा
भूतदया देई
मानवास उर्जा
भाद्रपद मासी
पूजती गणेश
आराध्य आरास
चालते विशेष
अश्विन मासात
शारदा दसरा
सोने देवोनिया
पूजती वासरा
दिवाळीचा सण
दीन श्रीमंताचा
तमावर जय
दिवा प्रकाशाचा
गोड पक्वानाने
बालिका पूजन
साऱ्या सृष्टीमध्ये
खगांचे गुंजन

— रचना : सौ शोभा प्रकाश कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
