निवृत्त दूरदर्शन संचालक श्री चंद्रकांत बर्वे यांनी त्यांच्या आकाशवाणी, दूरदर्शन च्या चाकरीत मोठमोठी व्यक्तिमत्वे जवळून पाहिली. काही व्यक्तिमत्वे दुरून जितकी मोठी वाटत होती, प्रत्यक्षात मात्र लेखकाला त्यांचा वेगळाच अनुभव आला. असे अनुभव लिहिण्याचे धाडस लेखक श्री चंद्रकांत बर्वे यांनी “सत्तरीची सेल्फी” या पुस्तकात केले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध निवेदक व लेखक श्री सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते, प्रमुख पाहुण्या -प्राध्यापिका – समीक्षक आशी नाईक यांच्या उपस्थितीत, निसर्गोपचार आश्रमचे वैद्यकीय संचालक, डॉ अभिषेक देविकर यांच्या अध्यक्षतेखाली निसर्गोपचार आश्रम, उरळी कांचन, पुणे येथे सोमवार, दिनांक १६ डिसेंबर २०२४ दुपारी ४.३० वाजता होत आहे.
या शुभ प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, अशी विनंती हे पुस्तक प्रकाशित केलेल्या न्यूज स्टोरी टुडे च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांनी केली आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी असणार आहे का?
“सत्तरीची सेल्फी” खूपच इंटरेस्टिंग असणार! नावातही नाविन्य दडलेले हे पुस्तक वाचण्याची अनिवार उत्सुकता निर्माण झाली आहे. अशा दर्जेदार पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आदरणीय अलका भुजबळ मॅडम आणि न्यूज स्टोरी प्रकाशन संस्थेच्या सर्वच सदस्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वतः लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि प्रकाशन समारंभासाठी तुम्हाला सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
आतुरता…. वाट पहात आहे
अनिल पाटील
-माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव
सत्तरी ची सेल्फी या नावापासूनच कुतुहल निर्माण करणाऱ्या आणि वाचकांची उत्कंठा वाढवणाऱ्या पुस्तक प्रकाशनाबद्दल लेखक श्री .चंद्रकांत बर्वे आणि प्रकाशक दांपत्य श्री आणि सौ.भुजबळ या उभयतांना मनःपूर्वक शुभेच्छा! एक प्रकारे माध्यमांच्या जगातील बर्वे सरांचा प्रदीर्घ अनुभव मराठी वाचकांना अधिक समृद्ध करून जाईल याची खात्री वाटते.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा….!!!
💐💐💐💐
हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा सर
व्वा खूप छान दमदार वाटचाली बद्दल व १३ व्या पुस्तक
प्रकाशन सोहळ्या निमित न्यूज स्टोरी टुडे च्या उत्साहाने
तळमळीने भारलेल्या अभिजात माय मराठीच्या समृद्धीसाठी झटणाऱ्या माननीय भूजबळ दाम्पत्याचं खूप खूप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.आदरणीय श्री.चंद्रकांत सरांचं सत्तरीची सेल्फी या पुस्तक प्रकाशना
बद्दल मनःपूर्वक अभिनंदन 🌹 🌹
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई 🙏