Home लेख “सत्तरीची सेल्फी”: विशेष कार्यक्रम

“सत्तरीची सेल्फी”: विशेष कार्यक्रम

1

दूरदर्शन चे निवृत्त निर्माते दीपक शेडगे यांच्या यु ट्यूब वाहिनीवर साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, चित्रकला, पर्यटन, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.

अशा विविध कार्यक्रमांबरोबर या वाहिनीवरील एक कार्यक्रम म्हणजे अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या एका पुस्तकावर विविध मान्यवरांची मनोगते रेकॉर्ड करून त्या पुस्तकाची परिपूर्ण ओळख करून देणारा “पुस्तकांच्या जगात” हा होय.

या अनुषंगाने दीपक शेडगे यांच्या यू ट्यूब वाहिनीवर, दूरदर्शनचे निवृत्त निर्माते श्री चंद्रकांत बर्वे यांनी लिहिलेल्या आणि सौ अलका देवेंद्र भुजबळ यांच्या ‘न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स’ ने प्रकाशित केलेल्या “सत्तरीची सेल्फी” या पुस्तकावर नुकताच कार्यक्रम सादर करण्यात आला आहे.

आपल्याला ज्ञात असेलच की, “सत्तरीची सेल्फी” या पुस्तकाचे प्रकाशन उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात १६ डिसेंबर २०२४ रोजी झाले.

त्यावेळी बोलताना सुप्रसिद्ध मुलाखतकार, लेखक श्री सुधीर गाडगीळ यांनी, हे पुस्तक लिहिण्याचे धाडस श्री चंद्रकांत बर्वे यांनी केल्याबद्दल आणि ते प्रकाशित करण्याचे धाडस सौ अलका देवेंद्र भुजबळ यांनी केल्याबद्दल दोघांचेही जाहीर अभिनंदन केले होते. अशा या पुस्तकाच्या आता पर्यंत जवळपास २०० प्रती बाजारात वाचकांच्या हाती पडल्या आहेत.

“सत्तरीची सेल्फी” या पुस्तकावरील कार्यक्रमात नाट्य दिग्दर्शक श्री विजय केंकरे, अभिनेते श्री प्रमोद पवार लेखिका तथा मराठी साहित्य परिषद तेलंगन च्या अध्यक्षा श्रीमती विद्या देवधर, लेखक श्री चंद्रक्रांत बर्वे यांची या पुस्तकाविषयीची मनोगते आहेत. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वतः श्री दीपक शेडगे यांनी केले आहे.
असा हा रंजक कार्यक्रम आपण पुढील 👇 लिंक वर नक्की पहा.

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. ‘सत्तरीची सेल्फी’ शीर्षकच धमाल आहे.
    वृत्तांत वाचून पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version