अहमदनगर येथील सप्तरंग थिएटर्सचा ३६ वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा झाला.
यावेळी संस्थेच्या वतीने नांदेड येथील नाथा चितळे यांना ‘सप्तरंग नाट्य गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्रामभैय्या जगताप व ज्येष्ठ सिनेनाट्य कलावंत प्रकाश धोत्रे उपस्थित होते.
यावेळी मनोगतामध्ये ज्येष्ठ नाट्यकर्मी नाथा चितळे यांनी अहमदनगरच्या नाट्य कलावंताविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी सप्तरंग थिएटर्सच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘अहमदनगर जिल्ह्याचा १०० वर्षाचा नाट्य व चित्रपटाचा आढावा’ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. तसेच नाट्य व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलावंताचा सत्कार करण्यात आला.
आरती अकोलकर दिग्दर्शित व सप्तरंग थिएटर्स निर्मित
सादर करण्यात आलेली.
‘मी तुझ्या जागी असते तर’ बाल एकांकिका उपस्थितांची दाद घेऊन गेली.
यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, सप्तरंग थिएटर्सच्या सप्तरंगोत्सवाचे स्वागताध्यक्ष डॉ. संतोष पोटे, सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे, स्मरणिकेचे संपादक डॉ. बापू चंदनशिवे, शशिकांत नजान, डॉ. सुदर्शन धस आदी मान्यवर उपस्थित होते.
सप्तरंग परिचय
अहमदनगर येथील तळमळीचे नाट्यकर्मी डॉ श्याम शिंदे यांनी १९८६ मध्ये सप्तरंग थिएटर्स ही नाट्यसंस्था स्थापन केली.

या संस्थेने आतापर्यंत मराठी, हिंदी व बालराज्य स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेऊन विविध पारितोषिके मिळविली आहेत. संस्थेने जिल्ह्यातील लेखक, नाटककार, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले असून गौरवपूर्ण कामगिरीबद्दल संस्था ओळखली जाते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800