Home बातम्या सप्तरंग : पारितोषिकांची लयलूट

सप्तरंग : पारितोषिकांची लयलूट

0

पंचमवेद’ आणि ‘तेरा मेरा सपना’ ला सहा पारितोषिके प्रदान 🎭

यावर्षीच्या ६३ व्या राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झाला. या दिमाखदार समारंभात अहिल्यानगर येथील सप्तरंग थिएटर्स या संस्थेला एकूण सहा पारितोषिके मिळाली.

ही पारितोषिके पुढील प्रमाणे आहेत.
१ “पंचमवेद” या मराठी नाटकासाठी नाट्य निर्मिती द्वितीय क्रमांक.
२ “पंचमवेद”: डॉ. श्याम शिंदे – दिग्दर्शन द्वितीय क्रमांक.
३ “तेरा मेरा सपना” या बालनाट्यासाठी नाट्य निर्मिती द्वितीय क्रमांक.
४ तेरा मेरा सपना : कल्पेश शिंदे – दिग्दर्शन द्वितीय क्रमांक
५ (तेरा मेरा सपना) गायत्री रोहोकले – स्त्री अभिनय रौप्यपदक.
६ तेरा मेरा सपना : साईराज सरडे – अभिनय प्रमाणपत्र

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संदीप वसावे, अभिनेत्री मीना वाघ आणि नाट्य परिषद, नाशिकचे अध्यक्ष सुनील ढगे, नाशिक स्पर्धा समन्वयक राजेश जाधव आणि चंद्रकांत झाडकर साहेब यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

संस्थेच्या या यशाबद्दल सर्व विश्वस्त, हितचिंतक, तंत्रज्ञ आणि रसिक नगरकरांनी अभिनंदन करीत आहेत.

डॉ श्याम शिंदे

अल्प परिचय
स्वतः नाट्यकर्मी असलेल्या डॉ श्याम शिंदे यांनी स्थापन केलेली सप्तरंग थिएटर्स ही नाट्य संस्था जवळपास ४० वर्षे सातत्याने कार्यरत आहे. संस्था गेली ३६ वर्षे महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेत आहे. संस्थेला आतापर्यंत राज्यनाट्य स्पर्धेची तब्बल १९६ पारितोषिके प्राप्त झाली आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हयातील एक हजारपेक्षा जास्त कलावंतांना विनाशुल्क नाटयशिक्षण देण्यात आले आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version