भरु तिच्या पंखात बळ
देवू तिला उच्च शिक्षण
सबल करुया लेकीला
येणार नाही वाईट क्षण
मनगट करु तिचे दणकट
शिकवू तिला स्वसंरक्षण
देवू धडे ज्युडो कराटेचे
होणार नाही तिचे भक्षण
पदोपदी घाणेरड्या नजरांचा
करेल जोमाने प्रतिकार ती
भिणार नाही नराधमांना
हिमतीने धडा शिकवेल त्यांना
द्या तिला पुर्ण स्वातंत्र्य
मना सारखे जगू द्या
स्वकर्तुत्वावर करेल प्रगती
भिणार नाही मग कोणाला
जगाच्या निर्मातीचा करा आदर
घडवेल ती भविष्य उज्ज्वल
खंबीर आधाराची द्या तिला साथ
नाव लौकिक करेल होवून सबला

– रचना : प्रा अनिसा सिकंदर शेख. दौंड, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800