आपल्या आयुष्यात समस्या या येतच असतात. पण आपण या समस्यांमध्ये अडकून न पडता त्यांना कॉमा करावे आणि सतत पुढे पुढे जात राहावे, असे स्वानुभवावर आधारित मार्गदर्शन न्यूज स्टोरी टुडे च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांनी केले.
“आकाशभरारी” या यू ट्यूब वाहिनीच्या “गृहस्वामिनी” या सदरात नुकत्याच घेण्यात आलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी हे मार्गदर्शन केले. रामेश्वरी आहेर यांनी घेतलेली ही मुलाखत उत्तरोत्तर चांगलीच रंगतदार आणि प्रेरणादायी ठरत गेली.

आपले आयुष्य सरळ, सुरळीत चालू असताना अचानक कॅन्सर चे निदान झाले आणि सर्व आयुष्यच बदलून गेले. आरोग्याची इतकी काळजी घेणारी मी, आणि मलाच कॅन्सर का व्हावा, हा प्रश्न मला सतावत होता. पण शेवटी आपल्याला कॅन्सर झाला, हे मी मान्य केले आणि कॅन्सर ला धीराने तोंड देत हे दाखवून दिले की कॅन्सर म्हणजे कॉमा असून त्याला आपण फुल स्टॉप समजता कामा नये. पुढे मी, माझ्या अनुभवांवर आधारित कॉमा पुस्तक लिहिले, जे डिंपल पब्लिकेशन ने प्रकाशित केले. तर याच नावाने लेखक – दिग्दर्शक आशिष निनगुरकर यांनी माहितीपटाची निर्मिती केली.
कॅन्सर विषयक जनजागृती करण्यासाठी कॉमा संवाद उपक्रम राबविण्यात येतो. आपण आपल्या आरोग्य विषयक काही तपासण्या दरवर्षी करण्याचे महत्व लोकांना पटावे, त्यांनी आपल्या आरोग्याविषयी जागरूक रहावे, हा या उपक्रमाचा हेतू आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
आपण ही संपूर्ण मुलाखत पुढील 👇 लिंक वर क्लिक करून अवश्य पाहा.
आपले अभिप्रायांचे, प्रतिक्रियांचे, सूचनांचे स्वागत आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
मस्त झाली मुलाखत. प्रत्येकाच्या आयुष्याला देत जाणारी तुझी प्रेरणा 🙋♀️
जगणं अवघड नाही, सोपे आहे. हा तुझ्यातील सकारात्मक विचार सर्वांसाठी दवाई होय.
सौ. वर्षा महेंद्र भाबल.
जुईनगर, नवी मुंबई.
Hats off to your courage n positivity your life story is really a great inspiration to many.
तुम्ही ग्रेट आहात मॅडम…मनःपूर्वक शुभेच्छा